Advertisement

अश्वीनी भिडेंची उचलबांगडी, आरे कारशेड प्रकरण भोवलं

आरे येथील प्रस्तावित मेट्रो 3 च्या कारशेडचं अश्विनी भिडे यांनी समर्थन केलं होतं.

अश्वीनी भिडेंची उचलबांगडी, आरे कारशेड प्रकरण भोवलं
SHARES
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरे कारशेडला ब्रेक लावल्यानंतर आता मेट्रो 3 (Metro) च्या प्रकल्पावरुन अश्विनी भिडे  (Ashwini bhide) यांची उचलबांगडी करण्यात  आली आहे.

हेही वाचाः- एलआयसीच्या २३ योजना १ फेब्रुवारीपासून बंद

 आरे कारशेडच्या मुद्याने नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक ही चांगलीच रंगली. मुख्यमंञी (chif minister) उद्धव ठाकरे यांनी आदीत्य ठाकरे यांनी त्याला विरोध दर्शवला होता.माञ याच आरे येथील प्रस्तावित मेट्रो 3 च्या कारशेडचं अश्विनी भिडे यांनी समर्थन केलं होतं. भिडे यांचा मेट्रो 3 च्या संचालक पदाचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये पूर्ण झाला होता. त्यामुळेच सत्तास्थापनेनंतर मुख्यमंञ्यांनी संधी पाहून भिडे यांना बाजूला केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. त्यामुळे भिडे यांच्याकडे कोणती जबाबदारी दिली जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.या कारशेडचं समर्थन करणाऱ्या अश्विनी भिडे यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आला आहे.


तर मेट्रो 3 च्या संचालक पदाची जबाबदारी रणजितसिंग देओल यांच्या सोपवण्यात आली आहे. देओल हे महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पदावर काम करत होते.  दरम्यान अश्विनी भिडे यांच्यासोबत इतर 20 अधिकाऱेयांच्या ही बदल्या करण्यात आल्या आहेत.त्यात कडक शिस्तीमुळे प्रसिद्ध असलेल्या तुकाराम मुंढेचाही समावेश आहे. तुकाराम मुंढे यांच्यावर नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आलीआहे.

हेही वाचाः- ‘नाईटलाइफ’ हा शब्दच आवडत नाही- उद्धव ठाकरे

मुंढे हे गेल्या काही महिन्यांपासून राज्याचे एड्स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक म्हणून काम पाहत होते. मात्र नुकतंच नागपूर महानगरपालिकेत आयुक्त म्हणून बदली करण्यात आल्याने फडणवीस यांची डोके दुखी वाढवण्यासाठीच मुंडे यांची नागपूर आयुक्तपदी निवड करण्यात आल्याचे समजते. याआधी या पदावर अभिजित बांगर काम करत होते.

हेही वाचाः-२ वर्षांत उभं राहू शकेल आंबेडकर स्मारक, शरद पवार यांचा विश्वास


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा