Advertisement

सायबर सुरक्षेबाबत महिला व विद्यार्थींनी जागरूक रहावे- मुख्यमंत्री

बहुतांश गुन्ह्यांत आरोपी महिला व महाविद्यालयीन विद्यार्थींना लक्ष करत असल्याचे अनेक गुन्ह्यांतून निदर्शनास आले आहे.

सायबर सुरक्षेबाबत महिला व विद्यार्थींनी जागरूक रहावे- मुख्यमंत्री
SHARES

मुंबईसह राज्यात वाढत्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेता, सर्वांनी या गुन्ह्यांबाबत जागृक राहणे गरजेचे आहे. असंख्य सायबर गुन्ह्यात महिला, विद्यार्थींनीना आरोपी लक्ष करतात. राज्यात अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी शासन प्रयत्नशील असून महिला व बालकांनीही सायबर सुरक्षेबाबत जागरुक राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, प्रत्येक पोलिस ठाण्यात सायबर कक्ष तयार करण्यात आले. मात्र तरी ही सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यात पोलिसांना हवे तितके यश आलेले नाही. बहुतांश गुन्ह्यांत आरोपी महिला व महाविद्यालयीन विद्यार्थींना लक्ष करत असल्याचे अनेक गुन्ह्यांतून निदर्शनास आले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी ‘सायबर सेफ वुमन’ मोहीम आता महाराष्ट्र पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला हा संदेश दिला आहे.

हेही वाचाः- डिजिटल पेमेंटची सुविधा नाकारल्यास दुकानदारांना दंड

‘सायबर सेफ वुमन’ मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे आणि महिलांसंदर्भातील गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांना मदत करावी असे आवाहन करून मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हटले आहे. आजच्या डिजिटल युगात इंटरनेटचे जसे अनेक फायदे आहेत, त्याचबरोबर काही वाईट गोष्टीही त्या माध्यमातून समाजात पसरत आहेत. सायबर गुन्ह्यांचे वाढणारे प्रमाण चिंताजनक असून त्याहीपेक्षा या गुन्ह्यांचे वारंवार बदलणारे स्वरूप जास्त गंभीर आहे. गेल्या काही काळात यामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शासनाने अशा गुन्ह्यांना आळा घालण्याबरोबरच महिला व बालकांच्या सायबर सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच एक भाग ‘सायबर सेफ वुमन’ मोहीम असून यासंदर्भातील जनजागृती कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

 हेही वाचा ः- खडसेंचे आरोप निराधार- गिरीश महाजन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा