Advertisement

मेट्रो-३ प्रकल्पातील 'इतक्या' स्थानकांचं खोदकाम १०० टक्के पूर्ण

मेट्रो-३ प्रकल्पाच्या कुलाबा ते सीप्झ या संपूर्ण भुयारी मार्गातील १३ स्थानकांचं १०० टक्के खोदकाम पूर्ण करण्यात आलं आहे.

मेट्रो-३ प्रकल्पातील 'इतक्या' स्थानकांचं खोदकाम १०० टक्के पूर्ण
SHARES

मेट्रो-३ प्रकल्पाच्या कुलाबा ते सीप्झ या संपूर्ण भुयारी मार्गातील १३ स्थानकांचं १०० टक्के खोदकाम पूर्ण करण्यात आलं आहे. उर्वरित १३ स्थानकांचं खोदकाम या वर्षीच्या मे महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे. या संपूर्ण भुयारी मार्गावर एकूण २६ स्थानके असून, स्थानकांचं एकूण ८७ टक्के खोदकाम पूर्ण झाल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सध्या सुरू असलेल्या स्थानकांच्या कामाला आणखी गती प्राप्त होणार आहे. उर्वरित स्थानकांचं खोदकाम युद्धपातळीवर सुरू आहे. तसंच, पुढील ३ ते ४ महिन्यात ते पूर्ण होणार असल्याची माहिती मिळते. उर्वरित स्थानकांपैकी सांताक्रूझ स्थानकाचं खोदकाम ९३ टक्के पूर्ण झालं असून, वरळी, दादर, शीतलादेवी, धारावी, वांद्रे-कुर्ला संकुल या स्थानकांचं खोदकाम ८० टक्क्य़ांहून अधिक पूर्ण झालं आहे. मेट्रो ३ साठी ग्राऊंड ब्रेकिंगला २०१६च्या अखेरीस सुरुवात झाली. त्यानंतर २ वर्षांत खोदकामानंतर अन्य कामांना वेग आला आहे.

स्लॅब, काँक्रीटीकरण, छताचं काम आदी विविध स्थानकांवर वेगानं काम सुरू आहे. कफ परेड स्थानकाच्या छताचं काम हे देखील पूर्ण होत आलं आहे. एमआयडीसी, सिद्धिविनायक मंदिर या स्थानकांचे बेस स्लॅबचं काम पूर्ण झालं आहे. त्याचबरोबर मार्गिकेच्या भुयारीकरणाच्या ३२ टप्प्यांपैकी २४ टप्प्यांचे भुयारीकरण पूर्ण झालं आहे. उर्वरित भुयारीकरण सप्टेंबरअखेर पूर्ण होणार आहे.

खोदकाम पूर्ण

कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी, सायन्स म्युझियम, सिद्धिविनायक, एमआयडीसी, मरोळ नाका, सहार रोड, सीएसएमआयए-आंतरदेशीय, सीएसएमआयए-आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सीप्झ या स्थानकांचा समावेश आहे.



हेही वाचा -

टॅक्सी इंडिकेटरची सक्ती केल्यास आंदोलनाचा इशारा

रेल्वेच्या गुन्ह्याबाबत महाराष्ट्राचा पहिला नंबर



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा