Advertisement

रेल्वेच्या गुन्ह्याबाबत महाराष्ट्राचा पहिला नंबर

२०१८ मध्ये महाराष्ट्रात रेल्वेच्या हद्दीत तब्बल ४६४६१ गुन्हे घडले असून तशा प्रकारची अधिकृत नोंद महाराष्ट्रातील रेल्वेच्या हद्दीत असलेल्या वेगवेगळ्या जीआरपी पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आलेली आहे

रेल्वेच्या गुन्ह्याबाबत महाराष्ट्राचा पहिला नंबर
SHARES

रेल्वेला सर्वाधिक महसूल हा महाराष्ट्राकडून दरवर्षी दिला जातो. मात्र त्या तुलनेत रेल्वेकडून प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतिही ठोस पाऊले उचलली जात नाही. नुकताच सोशल मिडियावर चालू तेजस एक्सप्रेसमध्ये महिलेची बॅग हिसकवण्याचा व्हिडिओ वायरल झाला होता. त्यावरून रेल्वे सुरक्षेबाबत केंद्र कितीगंभीर आहे. याचा अंदाज येतो. विशेष म्हणजे नॅशनल क्राईम ब्युरोच्या अहवालानुसार रेल्वेचा प्रवास महाराष्ट्रात सर्वाधिक धोकादायक असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

 नॅशनल क्राईम ब्युरोच्या अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये रेल्वेच्या हद्दीत घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. त्या पाठोपाठ राजधानी दिल्लीचा क्रमांकावर आहे. २०१८ मध्ये महाराष्ट्रात रेल्वेच्या हद्दीत तब्बल ४६४६१ गुन्हे घडले असून तशा प्रकारची अधिकृत नोंद महाराष्ट्रातील रेल्वेच्या हद्दीत असलेल्या वेगवेगळ्या जीआरपी पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आलेली आहे. तर या यादीत दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर असून २०१८ साली तब्बल ३४०७६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुन्ह्यांची नोंद होण्याचे कारण म्हणजे रेल्वे प्रवासात रेल्वेच्या प्रवाशांचे पाकीट, मोबाईल फोन किंवा इतर महत्त्वाच्या वस्तू चोरीस गेल्यानंतर आत्तापर्यंत यांची गहाळ झाल्याची नोंद जीआरपी पोलिस ठाण्यांमध्ये घेतली जात होती. मात्र, काही वर्षांपूर्वी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानुसार मोबाईल फोन, पर्स सारख्या गोष्टी हरवल्यास त्याची रीतसर तक्रार पोलीस ठाण्यांमध्ये घेतली जात असल्यामुळे महाराष्ट्रात रेल्वेच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचेही सांगितले जात आहे.


मुंबईतील लोकल रेल्वे, एक्सप्रेस आणि रेल्वेच्या हद्दीत घडलेले गुन्हे

खून - २०१७-१८ (२), २०१८-१९ (९)

दरोडा – २०१७-२०१८ (५६९), २०१८-१९ (१०५०)

बलात्कार – २०१७-१८ (५), २०१८-१९ (१)

विनयभंग - २०१७-१८ (७२), २०१८-१९ (९४)

 इतर गुन्हे - २०१७-१८ (२०४), २०१८-१९ (२७१)

 एकूण गुन्हे - २०१७-१८ (२३६५४), २०१८-१९ (२५४१२)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा