टॅक्सी इंडिकेटरची सक्ती केल्यास आंदोलनाचा इशारा

रुफलाइट इंडिकेटरला टॅक्सी संघटनांनी विरोध दर्शविला आहे.

SHARE

काळी-पिवळी टॅक्सी, रिक्षा रस्त्यावर उभी असल्यास ती प्रवाशांसाठी उपलब्ध आहे की नाही हे समजण्यासाठी 'रूफलाइट इंडिकेटर'ची मदत घेतली जाणार आहे. त्यानुसार, काळ्या-पिवळ्या टॅक्सींमध्ये रुफलाइट इंडिकेटर बसवण्याचा निर्णय परिवहन आयुक्त कार्यालयानं घेतला. काहीच दिवसांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला असून, जानेवारी महिन्याच्या अखेरीस व फेब्रूवारी महिन्याच्या सुरूवातील ही सुविधा प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, असं असतानाच रुफलाइट इंडिकेटरला टॅक्सी संघटनांनी विरोध दर्शविला आहे. तसंच, इंडिकेटरची सक्त केल्यास आंदोलन करण्याचा इशारा टॅक्सी संघटनांनी दिला आहे.

मागील ४ वर्षांत टॅक्सीचालकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झालं असून, त्यामुळंच हा विरोध असल्याचं परिवहन आयुक्तांना दिलेल्या पत्रात मुंबई टॅक्सीमेन्स युनियननं नमूद केलं आहे. मोबाइल अ‍ॅपआधारित टॅक्सींवर अंकुश ठेवण्यासाठी आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचालकांनाही टॅक्सी समन्वयक कंपन्यांचं व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी मुंबई शहर टॅक्सी योजना आखण्यात आली होती.

भाडेदर निश्चित करण्यासाठी त्यावेळी खटुआ समितीही नेमण्यात आली. मात्र, समितीनं केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी तर दूरच, त्या विचारातही घेण्यात आलेला नाहीत. प्रत्येक किलोमीटरमागे सीएनजीची किंमत वाढत असून, त्यानुसार भाडेवाढ देखील मिळालेली नाही. शासनानं चालकांचा विचार केला नसल्यानं टॅक्सीच्या छतावर बसवण्यात येणाऱ्या इंडिकेटरला विरोध करत असल्याचं संघटनेचं महासचिव ए.एल. क्वाड्रोस यांनी म्हटलं.हेही वाचा -

ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या पहिल्या गाळ्याच्या कामाला सुरूवात

दादर स्थानकाबाहेरील पूलाचा रॅप्म प्रवाशांसाठी खूलासंबंधित विषय
ताज्या बातम्या