Advertisement

दादर स्थानकाबाहेरील पूलाचा रॅप्म प्रवाशांसाठी खूला

पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकाबाहेरील पूलाचा रॅप्म प्रवाशांसाठी खूला करण्यात आला आहे.

दादर स्थानकाबाहेरील पूलाचा रॅप्म प्रवाशांसाठी खूला
SHARES

पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकाबाहेरील पूलाचा रॅप्म प्रवाशांसाठी खूला करण्यात आला आहे. दुरूस्तीच्या कामासाठी हा रॅम्प बंद करण्यात आला होता. काही महिन्यांपूर्वीच या पुलाचा रॅम्प आणि स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. २ व ३ वर उतरणारा जिना रविवारी बंद करण्यात आला आहे. मात्र, आता पुलाच्या रॅम्पची दुरूस्ती झाली आहे. तसंच, सोमवारी हा रॅम्प प्रवाशांसाठी खूला करण्यात आला आहे.

दादर पश्चिम स्थानकाबाहेर असलेल्या या पुलाच्या पायऱ्यांचा चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी वापर होतो. मात्र, काही प्रवाशांना शिड्या चडणं व उतरणं शक्य नसल्यानं ते पुलाच्या रॅम्पचा वापर करतात. परंतु, हा रॅम्पच दुरुस्तीकरीता बंद करण्यात आल्यानं प्रवाशांना पायऱ्यांचा वापर करावा लागत होता. परिणामी प्रवाशांच्या त्रासात मोठ्या सामोरं जावं लागत होतं.

रॅम्पच्या दुरूस्तीवेळी ४.१ रुंद व ३० मीटर लांब असा नवा रॅम्प उभारण्यात आला आहे. या रॅम्पच्या दुरूस्तीच्या कामासाठी ६५ लाख रुपये खर्च आल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनानं दिली. दरम्यान, हा रॅम्प पुन्हा सुरू झाल्यानं प्रवाशांना दिलासा मिळाला असून, दादर पूर्व येथून पश्चिमेला येणाऱ्या प्रवाशांना मोठी कलरत करावी लागत नाही आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पादचारी पुलाच्या दुर्घटनेनंतर जाग आलेल्या रेल्वे प्रशासनानं रेल्वे मार्गावरील पुलांची पाहणी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दादर स्थानकातील दक्षिण दिशेच्या पुलाची पाहणी केली असता, या पाहणीमध्ये हा पूल धोकादायक असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळं प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं दादर स्थानकाबाहेरील या पुलाचा रॅम्प आणि स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. २ व ३ वर उतरणारा जिना रविवारी बंद करण्यात आला.



हेही वाचा -

मेट्रो-३ प्रकल्पातील 'इतक्या' स्थानकांचं खोदकाम १०० टक्के पूर्ण

टॅक्सी इंडिकेटरची सक्ती केल्यास आंदोलनाचा इशारा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा