ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या पहिल्या गाळ्याच्या कामाला सुरूवात

मुंबईतील ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या समुद्रातील पुलाच्या पहिल्या गाळ्याच्या उभारणीच्या कामाला सुरूवात होणार आहे.

SHARE

मुंबईतील ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या समुद्रातील पुलाच्या पहिल्या गाळ्याच्या उभारणीच्या कामाला सुरूवात होणार आहे. तसंच, या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आलं आहे. या प्रकल्पाच्या उभारणीतील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. स्वयंचलित लॉचिंग गर्डरद्वारा पुलाच्या प्रकल्पाच्या पहिल्या स्पॅनची उभारणी करण्यात येत आहे.

हा पूल भारतातील सर्वात जास्त लांबीचा समुद्रावरील पूल ठरणार आहे. मुंबई पारबंदर प्रकल्पामध्ये मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या सुमारे २२ किमी लांबीच्या ६ पदरी (३+३ मार्गिका) पुलाचा अंतर्भाव आहे. या पुलाची समुद्रातील लांबी सुमारे १६.५ किमी असून जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे ५.५ किमी आहे.


या पुलाला मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील शिवाजी नगर व राष्ट्रीय महामार्ग-४ ब वर चिर्ले गावाजवळ आंतरबदल प्रस्तावित आहेत. या लाँचिंग गर्डरचं वजन १००० मे. टन आहे. तसंच, लॉचिंग गर्डरची वजन उचलण्याची एकूण क्षमता सुमारे १४०० मे. टन इतकी आहे. प्रकल्पाचा बांधकाम कालावधी सुमारे साडेचार वर्षांचा आहे. त्यानुसार सप्टेंबर-२०२२ पर्यंत या प्रकल्पाचं काम पूर्ण करण्याचं नियोजन आहे.हेही वाचा -

दादर स्थानकाबाहेरील पूलाचा रॅप्म प्रवाशांसाठी खूला

मेट्रो-३ प्रकल्पातील 'इतक्या' स्थानकांचं खोदकाम १०० टक्के पूर्णसंबंधित विषय
ताज्या बातम्या