Advertisement

देशात सध्या फक्त ‘मोदी लिपी’, राज ठाकरेंचा मिश्कील टोमणा

सुलेखनकार अच्युत पालव यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला ​राज ठाकरे​​​ उपस्थित होते. यावेळी त्यांनी पालव यांच्या कामाचं कौतुक केलं.

देशात सध्या फक्त ‘मोदी लिपी’, राज ठाकरेंचा मिश्कील टोमणा
SHARES

सध्या भारतात मोडी लिपी (modi script) नाही, तर सगळीकडे मोदी लिपी दिसत असल्याचा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी आपल्या मिश्कील शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला लगावला. सुलेखनकार अच्युत पालव  यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी पालव यांच्या कामाचं कौतुक केलं.  

हेही वाचा- कोणता झेंडा घेणार हाती?

अच्युत पालव (achyut palav) यांचं सुलेखन (calligraphy) बघायला चांगलं वाटतं. वरवर सुलेखनाचं हे काम अतिशय सोपं वाटतं. पण काम सुरू केल्यावर त्यातील खऱ्या अडचणी समजतात. या कामामागे त्यांची कित्येक वर्षांची मेहनत आहे. ही मेहनत मी सुरूवातीपासून बघतोय. मागे मुंबईत झालेल्या पावसात त्यांचं बहुमूल्य साहित्य भिजलं. पण त्यांनी हार न मानता सुलेखनासाठी आपली मेहनत सुरूच ठेवली, असे कौतुकोद्गार राज यांनी काढले. 

मोडी लिपीविषयी बोलताना राज म्हणाले, माझं अक्षर चांगलं असण्यामागचं कारण आहे दिवंगत बाळासाहेब ठाकरे (bal thackeray) आणि माझे वडील. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे (prabodhankar thackeray) मोडी लिपीत स्वाक्षरी करायचे. कारण पूर्वी मोडी लिपी (modi script) होती. पण या लिपीवर आज कोणीही काम करताना दिसत नाही. सध्या देशात केवळ मोदी लिपीच पाहायला मिळतेय. 

हेही वाचा- अळूचं फदफदं की मिरचीचा ठेचा, संदीप देशपांडेंचा शिवसेनेला टोमणा

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा