Advertisement

कोणता झेंडा घेणार हाती?

महाअधिवेशनाच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) पक्षाला नवी दिशा देतील असं म्हटलं जात आहे. मनसेचा तरूण चेहरा म्हणून अमित ठाकरेंची याच अधिवेशातून अधिकृत एण्ट्री होऊ शकते आणि पक्षाचा नवा झेंडाही याच अधिवेशनात लाॅन्च होण्याची शक्यता आहे.

कोणता झेंडा घेणार हाती?
SHARES

येत्या २३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Bal thackeray) यांच्या जयंतीदिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं (mns) मुंबईत महाअधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. या महाअधिवेशनाच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) पक्षाला नवी दिशा देतील असं म्हटलं जात आहे. मनसेचा तरूण चेहरा म्हणून अमित ठाकरेंची याच अधिवेशातून अधिकृत एण्ट्री होऊ शकते आणि पक्षाचा नवा झेंडाही याच अधिवेशनात लाॅन्च होण्याची शक्यता असल्याने या अधिवेशनाकडे केवळ मनसैनिकच नाही, तर महाराष्ट्रातील तमाम राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागलं आहे. 

सतत अपयश

भाषिक अस्मितेच्या मुद्द्यावर जन्माला आलेल्या मनसेने मागील १३ वर्षांमध्ये असंख्य आंदोलने हाती घेतली, अनेक मुद्द्यांना हात हातला. मग ते रेल्वेभरतीत परप्रांतियांची घुसखोरी असो, मराठीतून परीक्षा, टोलवसुलीचा जाच असो किंवा बेकायदा फेरीवाल्यांचा (hawakers) प्रश्न असो, मनसेने आपल्या स्टाइलने असंख्य विषय तडीस नेण्याचा प्रयत्न केला. काही प्रयत्नांमध्ये पक्षाला यश मिळालं, तर काही प्रयत्नांमध्ये यश मिळूनही म्हणावं तसं क्रेडीट मिळालं नाही. परिणामी आंदोलनाचं राजकीय मायलेज उचलण्यात अपयशी ठरलेल्या मनसेला महापालिका (bmc), विधानसभा (vidhan sabha), लोकसभेसारख्या (lok sabha election) निर्णायक लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. 

हेही वाचा- पाॅलिटिकल किडेगिरी, शिवरायांच्या चेहऱ्यावर नरेंद्र मोदींचा चेहरा

चालून आलेली संधी

स्थानिक ते राज्य पातळीवरील निवडणुकांमध्ये सततची होणारी हार, वरच्या फळीतील नेत्यांनी पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी, कार्यकर्त्यांमधील निरूत्साहीपणा या ना अनेक कारणांमुळे राज्यात पक्षाचा म्हणावा तसा विस्तार होऊ शकला नाही. त्यामुळे काळाच्या ओघात कात टाकून नवं रूप धारण करण्याची गरज आता पक्षनेतृत्वाला जाणवू लागली आहे. त्यातच अत्यंत मोक्याच्या क्षणी महाविकास आघाडीने (maha vikas aghadi) आयती संधी देखील उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या संधीचं सोनं करण्यासाठी मनसेच्या पक्षनेतृत्वाचे हात शिवशिवत नसतील, तरच नवल. 


शिवसेना (shiv sena) आणि भाजपने (bjp) हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लोकसभेपाठोपाठ विधानसभेची निवडणूक लढवून भरघोस यश मिळवलं. परंतु सत्ता वाटपाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांत बिनसल्याने दोघांचा ३० वर्षांचा संसार मोडला. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार बनवलं. त्यासाठी शिवसेनेला कडव्या हिंदुत्वाचा (hindutva) त्याग करून सेक्युलर हिंदुत्व पत्करावं लागलं आहे. पण या वाटेवरून चालताना शिवसेनेची जागोजागी कोंडी होताना दिसत आहे. अन् हीच मनसेसाठी उत्तम संधी असल्याचं म्हटलं जात आहे.

हिंदुत्वाचा पुरस्कार

महाराष्ट्रात कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष म्हणून मनसेने भूमिका घेतल्यास पक्षाला निवडणुकांमध्ये यश मिळू शकेल, असा पक्षनेतृत्वाचा होरा असल्याने या दिशेने पक्षनेतृत्वाचं एक पाऊल पुढं पडल्याचं म्हटलं जात आहे. मध्यंतरी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अफवांचं पीक आलं होतं. मनसेने हिंदुत्वाचा पुरस्कार केल्यास भविष्यात भाजप आणि मनसे युती होऊ शकते, असंही वक्तव्य काही भाजप नेत्यांकडून करण्यात आल्याने या अफवांना बळ मिळालं.


झेंड्यात बदल?

पक्षाला नवी ओळख देण्यासोबतच कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश निर्माण करण्यासाठी पक्षाचा झेंडाही बदलण्यात येईल, असं सांगितलं जात आहे. सद्यस्थितीत निळा, केशरी, हिरवा आणि मध्ये पांढऱ्या रंगाचा असलेला झेंडा पूर्ण केशरी (saffron flag) रंगाचा होईल. या झेंड्याच्या मधोमध शिवमुद्रा (shivmudra) असेल, असंही म्हटलं जात आहे. परंतु या झेंड्याला संभाजी ब्रिगेड सारख्या काही संघटनांनी विरोध दर्शवल्याने राजमुद्रेच्या जागी मनसेचं निवडणूक चिन्ह असलेलं इंजिन (railway engine) येण्याचीही शक्यता आहे. 

हेही वाचा- राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून मनसे प्रमुख राज ठाकरेंना शिवीगाळ, कार्यकर्त्यांनी दिला चोप

यंग एण्ट्री

या सगळ्यात सर्वात चर्चेचा विषय ठरू शकतो तो म्हणजे राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे (amit thackeray) यांचं राजकारणातलं पदार्पण. अमित ठाकरे यांनी याआधी काही मुद्द्यावर आपली भूमिका जाहीर केलेली असली, काही आंदोलनाचं नेतृत्व केलं असलं, तरी पक्षाचे नेते म्हणून अजूनही अमित ठाकरे व्यासपीठावर अवतरलेले नाहीत. एकाबाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचे चिरंजीव आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) राजकारणात पूर्णपणे सक्रीय झालेले असताना तसंच मुख्यमंत्र्यांची सावलीसारखी साथसोबत करत असताना अमित ठाकरेंची एण्ट्री राजकारणात मोठा चर्चेचा विषय ठरू शकते. तसंच पक्षाला तरूण चेहराही मिळू शकतो.


मनसेने आपल्या ट्विटर हँडलवर पक्षाचं चिन्ह नव्या स्वरूपात टाकलं आहे. काही दिवसांपूर्वीच मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनपुढे लावलेल्या भगव्या रंगातील पोस्टर्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या पोस्टर्सच्या माध्यमातून वातावरणनिर्मिती झाली असली, तरी राज ठाकरेंचा खरा कस लागणार आहे, तो हिंदुत्वाच्या मुद्द्याचा पुरस्कार करताना. त्यामुळे मनसे जहाल हिंदुत्व स्वीकारणार का? महाविकास आघाडीच नाही, तर एनआरसी (nrc), सीएए (caa) या मुद्द्यांवर राज ठाकरे (raj thackeray) आपल्या भाषणातून काय बाेलणार? भविष्यात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) आणि अमित शहा (amit shah) यांच्याबाबतची भूमिका बदलणार का? अशा एक ना अनेक मुद्द्याकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष असणार आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा