Advertisement

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून मनसे प्रमुख राज ठाकरेंना शिवीगाळ, कार्यकर्त्यांनी दिला चोप

ऐन निवडणूकीवेळी शिवसेनेला तर काही जणांनी राष्ट्रवादीला सहकार्य केल्याने या जागेवर मनसेचा पराभव झाला. पक्षविरोधी काम करणाऱ्याचे पुरावे मिळताच त्यांना पक्षाकडून बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याची माहिती मनसे नेते राजन गावंड यांनी दिली.

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून मनसे प्रमुख राज ठाकरेंना शिवीगाळ, कार्यकर्त्यांनी दिला चोप
SHARES

अंबरनाथ येथे मनसे (MNS) प्रमुक राज ठाकरे (Raj thackeray) यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी मनसैनिकांनी राष्ट्रवादी (NCP)च्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. विधानसभा निवडणूकी (Assembly elections)चा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. या घटनेमुळे अंबरनाथ परिसरातील वातावरण तणावदर्शक असून पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे. तर या घटनेनंतर दोघांनी एकमेकांविरोधात तक्रारी नोंदवल्या असून पोलिस अद्याप कुणाला ही अटक केलेली नाही.  

हेही वाचाः- पोलीसांच्या अश्वदलाला Amul ने अशा प्रकारे दिली मानवंदना

मनसेकडून नुकतीच उमेदवार सुमेध भवार यांनी विधानसभेची जागा लढवली. त्यावेळी त्यांचा पराभव झाला. भाजप (BJP)मध्ये असलेले भवार विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने ऐन निवडणूकीत मनसेत प्रवेश करत, तिकिट मिळवले. सुमेध यांना तिकिट दिल्याने जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. भवार यांनी मनसेत प्रवेश केल्यानंतर त्याचे स्वीय सहाय्यक सचिन अहिरेकर यांनी त्याची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. ही गोष्ट भवार यांना रूजली नाही. निवडणूकीत अहिरेकर हे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना गाटून भवार यांच्याविरोधात प्रचार करण्यासाठी आग्रह करत होते. ही बाब भवार यांना कळाली. शनिवारी भवार यांनी अहिरेकर यांना अंबरनाथच्या महात्मा गांधी (Mahatma Gandhi) शाळेजवळ भेटायला बोलावले. तिथे दोघांमध्ये शाब्दीक वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, दोघेही एकमेकांना शिवागाळ करू लागले. ऐवढ्यावरच न थांबता आहिररावयांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विषयी अपशब्द वापरल्यानंतर भवार यांचे संतुलन सुटले. त्यावेळी भवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अहिरराव यांना मारहाण केली.

हेही वाचाः- महापालिका उभारणार महालक्ष्मीला रेल्वे मार्गावर २ पूल

हा वाद इतक्यावर न थांबता दोघांनी पोलिस स्टेशन गाठत एकमेकांविरोधात तक्रार नोंदवली. या प्रकरणी अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही. अंबरनाथमधील मनसेतील अंतर्गत नाराजी आता उफळून आली आहे. अनेकांनी निवडणूकीवेळी शिवसेने (Shivsena) ला तर काही जणांनी राष्ट्रवादीला सहकार्य केल्याचे बोलले जाते. त्यामुळेच भवार यांचा पराभव झाला असल्याचे बोलले जाते. या मतदार संघातून नागरिकांनी मनसेला मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. मात्र पक्षविरोधी काम करणाऱ्यांमुळे मनसेला या ठिकाणी फटका बसल्याचे बोलले जाते. पक्षविरोधी  काम करणाऱ्याचे पुरावे मिळताच त्यांना पक्षाकडून बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याची माहिती मनसे नेते राजन गावंड यांनी दिली. सध्या तरी महाअधिवेशना निमित्त मनसेकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असून त्या अनुशंगाने जय्यत तयारी सुरू आहे.  

हेही वाचाः- वरळीतील 'या' वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर दुर्लक्ष


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा