Advertisement

प्रस्ताव देणाऱ्यांची नावे सांगा, शिवसेनेचं चव्हाणांना आव्हान

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसला २०१४ मध्ये आॅफर दिली होती. हा पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा शिवसेनेनेही फेटाळून लावला आहे.

प्रस्ताव देणाऱ्यांची नावे सांगा, शिवसेनेचं चव्हाणांना आव्हान
SHARES

शिवसेना (shiv sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसला २०१४ मध्ये आॅफर दिली होती. परंतु ही आॅफर मी धुडकावून लावल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) यांनी केला होता. हा दावा राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ शिवसेनेनेदेखील फेटाळून लावला आहे.

काय म्हणाले होते चव्हाण? 

‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) म्हणाले,  २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर भाजपला रोखण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (congress) एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला होता. परंतु हा प्रस्ताव मी फेटाळून लावला. विरोधी विचारधारा असलेल्या पक्षासोबत आघाडी न करण्यावर काँग्रेस ठाम होती. त्यामुळे विरोधी बाकांवर बसण्याचा निर्णय आम्ही घेतला. आताही शिवसेनेसोबत (shiv sena) सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) तयार नव्हत्या. परंतु चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर त्यांनी शिवसेनेसोबत आघाडीचा निर्णय घेतला.

हेही वाचा- शिवसेनेशी बोलणं झालं असेल, पण आमच्याशी नाही, चव्हाणांचा दावा राष्ट्रवादीने फेटाळला

चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी प्रतिक्रिया देत, चव्हाण यांचं वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज आहे. यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड होताे. सत्तेपुढं विचारधारा, तत्व, मूल्य अशा गोष्टींना काहीच किंमत नाही का? हे शिवसेनेने आधी स्पष्ट केलं पाहिजे, अशी मागणी केली.

तर, महाविकास आघाडी सरकार (maha vikas aghadi) मधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी चव्हाण यांचा दावा फेटाळून लावला. काँग्रेस हा एक वेगळा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेचं काँग्रेससोबत बोलणं झालं असेल, पण राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेकडून असा कुठलाही प्रस्ताव मिळाला नव्हता, असा खुलासा मलिक यांनी केला आहे.

यासंदर्भात शिवसेना आमदार अनिल परब (anil parab) यांना विचारलं असता, मला अशा कुठल्याही प्रस्तावाबाबत कल्पना नाही, कारण त्यावेळी आपण तिथं उपस्थित नव्हतो. हा प्रस्ताव पृथ्वीराज चव्हाण यांना कुणी दिला होता, हे त्यांनाच ठाऊक. त्यामुळे त्यांनी प्रस्ताव देणाऱ्यांची नावे उघड करावीत, असंही परब म्हणाले.

हेही वाचा- २०१४ मध्येच शिवसेनेकडून सत्तास्थापनेची आॅफर, पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा