Advertisement

२०१४ मध्येच शिवसेनेकडून सत्तास्थापनेची आॅफर, पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

सन २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला सरकार स्थापन करण्यासाठी आॅफर दिली होती. परंतु ही आॅफर मी धुडकावून लावल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

२०१४ मध्येच शिवसेनेकडून सत्तास्थापनेची आॅफर, पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट
SHARES

सन २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर (2014 Vidhan sabha election) भाजपला रोखण्यासाठी शिवसेना (shiv sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) आपल्याला सरकार स्थापन करण्यासाठी आॅफर दिली होती. परंतु ही आॅफर मी धुडकावून लावल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) यांनी करताच महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत चव्हाण यांनी हे वक्तव्य केलं.

हेही वाचा- नाईटलाइफवरून शिवसेना-राष्ट्रवादीत मतभेद?

विरोधी विचारधारा असतानाही काँग्रेसने (congress) शिवसेनेसोबत आघाडी करत महाराष्ट्रात सरकार स्थापन कसं केलं? या प्रश्नाला उत्तर देताना चव्हाण म्हणाले की, २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर त्यावेळची राजकीय परिस्थिती बघून शिवसेना (shiv sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला होता. परंतु दोन्ही पक्षांचा हा प्रस्ताव मी फेटाळून लावला. राजकारणात जय-पराजय होतच असतात. परंतु विरोधी विचारधारा असलेल्या पक्षासोबत आघाडी करण्यास अनुकूल नसल्यानेच विरोधात बसण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. आताही शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) उत्सुक नव्हत्या परंतु चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर त्यांनी शिवसेनेसोबत आघाडीचा निर्णय घेतला.  

चव्हाण यांचं वक्तव्य समोर आल्यानंतर  पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) यांच्यासारख्या नेत्याने हे वक्तव्य केल्याने ते गांभीर्याने घेतलं पाहिजे. यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड होताे. याचा शिवसेनेने खुलासा केला पाहिजे. सत्तेपुढं विचारधारा, तत्व, मूल्य अशा गोष्टींना काहीच किंमत नाही का? हे स्पष्ट केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया विधानसभेतील (Vidhan sabha) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी दिली.  

काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (indira gandhi) मुंबईतील माफीया डाॅन करीम लाला (karim lala) याला भेटायच्या असं वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली होती. काँग्रेसकडून राऊत यांना समजही देण्यात आली होती. यावरून महाविकास आघाडीत (maha vikas aghadi) बिघाडीत होते की काय अशी शंकाही उपस्थित करण्यात येऊ लागली होती. परंतु राऊत यांनी आपलं विधान मागे घेतल्यानंतर हे प्रकरण शांत झालं. 

हेही वाचा- ‘ही’ १२ वादग्रस्त वक्तव्ये, ज्यामुळे शिवरायांनाही झालं असेल दु:ख

त्यानंतर चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेला खुलासा करावा लागत आहे. दोन्ही पक्षांकडून असा कुठलाही प्रस्ताव घेऊन आम्ही चव्हाण यांच्याकडे गेलेलो नव्हतो, असं स्पष्टीकरण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलं आहे. यावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीत अस्वस्थता पसरली आहे. यावर मुख्यमंत्र्यांकडून काय खुलासा करण्यात येतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा