पोलिसांच्या अश्वदलाला Amul ने अशा प्रकारे दिली मानवंदना

तब्बल ८८ वर्षांनी पुन्हा अश्वदलाचा (माऊंटेड पोलिस युनिट) समावेश करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या प्रजासत्ताक दिनात मुंबई पोलिसांचे अश्वदला सर्वांचेच खास आकर्षण ठरणार आहे.

पोलिसांच्या अश्वदलाला Amul ने अशा प्रकारे दिली मानवंदना
SHARES

प्रजासत्ताक दिना(Republic Day)ची मुंबईच्या शिवाजी पार्क (Shivaji park) येथे जय्यत तयारी सुरू आहे. मात्र यावेळी प्रजासत्ताक दिनाची निमित्त चर्चा आहे ती म्हणजे, मुंबई पोलिस दलात नव्याने सहभागी झालेल्या अश्वदलाची. या अश्वदलाचे कौतुक करण्यासाठी म्हणून Amul कंपनीने आपल्या खास शैलीत त्यांना मानवंदना दिली आहे.  २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क येथे होणाऱ्या ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभातील संचलनात हे पथक सहभागी होणार आहे. मुंबई पोलिसांचे अश्वदळ वाहतूक नियंत्रण(Traffic control), गर्दी, चौपटीसारख्या ठिकाणी गस्त, नियंत्रणासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास गृहमंत्री (Home minister) अनिल देशमुख यांनी रविवारी व्यक्त केला.

हेही वाचाः- 'या' ४ लोकल सेवेतून बाद

मुंबई पोलिस(Mumbai Police)  दलात तब्बल ८८ वर्षांनी पुन्हा अश्वदलाचा (माऊंटेड पोलिस युनिट) समावेश करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या प्रजासत्ताक दिनात मुंबई पोलिसांचे अश्वदला सर्वांचेच खास आकर्षण ठरणार आहे. या अश्वदलासोबत त्यांच्या गणवेशाची ही विशेष चर्चा सुरु आहे. घोडेस्वार पोलिसांचा गणवेश प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा (Manish Malhotra) यांनी तयार केला आहे. या गणवेशाचे आणि अश्वदलाचे कौतुक करण्यासाठी म्हणून Amul कंपनीने आपल्या खास शैलीत त्यांना मानवंदना दिली आहे. हा अश्वदलाला आणि प्रजाकसत्ताक दिनाला उद्देशून हा लोगो तयार करण्यात आला आहे. अमूलने त्यांच्या ट्विटर अकाऊन्टवरून हा फोटो अधिकृत रित्या शेअर केला असून 'Police Ke Liye Horsela' असे कॅप्शन दिले आहे. इतकच नव्हे तर आपल्या उत्पादनांच्या प्रमोशनसाठी त्यांनी या फोटोखाली 'Gallop it down' असेही लिहिले आहे.

भारतात दूध उत्पादक आणि उत्पादन पुरवणारी कंपनी म्हणून ‘अमूल’ ही प्रसिद्ध आहे. मात्र त्याच बरोबर बाजारात चर्चा असते ती अमूल कंपनीच्या जाहिरातीची, रोजच्या घडामोडीला अनुसरून ही कंपनी आकर्षक जाहिरात बनवते. यंदा कंपनीने प्रजाकसत्ताक दिनी मुंबईत होणा-या अश्वदलाचे विशेष कौतुक करण्यासाठी त्यांनी ही सुंदर जाहिरात बनविली आहे.

हेही वाचाः-वरळीतील 'या' वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर दुर्लक्ष

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा