Advertisement

वरळीतील 'या' वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष

वसहतीगृहातील (Hostel) अनेक समस्यांनी विद्यार्थी बेजार झाले असून, याबाबत विद्यार्थ्यांनी वारंवार तक्रारी (Complaints) केल्या आहेत.

वरळीतील 'या' वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष
SHARES

मुंबईतील वरळी (Worli) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचं वसतिगृह (Dr. Babasaheb Ambedkar mens Hostel) आणि संत मीराबाई मुलींच्या वसतिगृहातील (Sant Mirabai Girls hostel) विद्यार्थ्यांना (Students) अनेक समस्यांना (Issues) सामोरं जावं लागत आहे. वसहतिगृहातील (Hostel) अनेक समस्यांनी विद्यार्थी बेजार झाले असून, याबाबत विद्यार्थ्यांनी वारंवार तक्रारी (Complaints) केल्या आहेत. मात्र, त्यांच्या तक्रारींची समाजकल्याण विभागाकडून (Department of Social Welfare) दखल घेतली जात नसल्याची माहिती समोर येत आहे.

अनेक समस्यांबाबत तक्रार (Complaints) करूनही तोडगा निघत नसल्यानं सहाय्यक आयुक्तांची बदली करावी, या मागणीसाठी (Demands) विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. विद्यार्थ्यांनी शनिवारी रात्रीपासून वसतिगृहाबाहेर आंदोलन (Protest) सुरू केलं. या आंदोलनावेळी विद्यार्थ्यांचे प्रश्‍न तातडीनं मार्गी लावण्याचे आश्‍वासन समाजकल्याण आयुक्तांनी (Social Welfare Commissioner) दिल्यानंतर रविवारी रात्री उशिरा विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतल्याचं समजतं.

हेही वाचा - काळा घोडा कला महोत्सव १ फेब्रुवारीपासून

वरळी इथं मुलांचं आणि मुलींचं वसतिगृह आहे. या वसतिगृहांत राहत असलेल्या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना (Issues) सामोरं जावं लागत आहे. या वसहतीगृहात विद्यार्थ्यांना (Students) निष्कृष्ट दर्जाचं जेवण कंत्राटदारांकडून (Contractor) देण्यात येत आहे. त्यामुळं कंत्राटदार हटविण्याची मागणी विद्यार्थ्यांनी विभागाकडं पत्राद्वारे केली होती. तसंच वसतिगृहातील शौचालयांची स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून राखण्यात येत नाही. त्यामुळं दुर्गंधी व अस्वच्छता पसरली आहे.

त्याशिवाय, लायब्ररी उपलब्ध नाही, सरकारी अध्यादेशाप्रमाणं पुस्तकं मिळत नसल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या या समस्यांबाबत अनेकदा तक्रारी करूनी दुर्लक्ष होत असल्यानं शनिवारी विद्यार्थ्यांनी रात्रीपासून अचानक आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानं आंदोलन मागे घेण्यात आलं.

हेही वाचा - पहिलं विभागीय मुख्यमंत्री ऑफिस नवी मुंबईत सुरू

रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी समाजकल्याण विभागाचे उपायुक्त (Deputy Commissioner of Social Welfare) विद्यार्थ्यांच्या भेटीला आले होते. त्यांनी रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्या (Students Demands) समजून घेतल्या. या मागण्या विहित मुदतीमध्ये पूर्ण करण्याचं लेखी आश्‍वासन त्यांनी दिलं. त्यांच्या या आश्‍वासनानंतर विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन (Protest) मागे घेतलं. परंतु, अधिकाऱ्यांनी दिलेलं हे आश्‍वासन वेळेत पूर्ण न झाल्यास पुन्हा विद्यार्थी आंदोलन करतील, असा इशारा वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी दिला आहे.



हेही वाचा -

'या' ४ लोकल सेवेतून बाद

'व्हायग्रा'च्या नावाखाली मुंबईतून अमेरिकन नागरिकांना कोट्यावधी रुपयांना गंडा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा