Advertisement

काळा घोडा कला महोत्सव १ फेब्रुवारीपासून

काळा घोडा कला महोत्सवाचं (Kala Ghoda Art Festival) यंदा २१ वं वर्ष आहे. या महोत्सवासाठी देश-विदेशातून कलाकारमंडळी येत असतात. काळा घोडा महोत्सवात संगीत (Music), नृत्य (Dance), साहित्य ( Literature), नाटक (Drama) अशा अनेक कला सादर केल्या जातात.

काळा घोडा कला महोत्सव १ फेब्रुवारीपासून
SHARES

कला साहित्य आणि संस्कृतीचा अनोखा संगम असलेला काळा घोडा कला महोत्सव (Kala Ghoda Art Festival) हा मुंबईकरांसाठी पर्वणी असतो. १ फेब्रुवारीपासून काळा घोडा कला महोत्सवाला सुरूवात होणार आहे. ९ फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. 

काळा घोडा कला महोत्सवाचं (Kala Ghoda Art Festival) यंदा २१ वं वर्ष आहे. या महोत्सवासाठी देश-विदेशातून कलाकारमंडळी येत असतात. काळा घोडा महोत्सवात संगीत (Music), नृत्य (Dance), साहित्य ( Literature), नाटक (Drama) अशा अनेक कला सादर केल्या जातात. त्यामुळे हा उत्सव मुंबईकरांसाठी मोठी पर्वणी असते. ९ दिवस चालणारा हा महोत्सव सकाळीगोदावरी घंटा १० ते रात्री १० पर्यंत सुरू राहणार आहे. 

संगीत, नृत्य, साहित्य, नाटक अशा विविधांगी कलांचं दर्शन काळा घोडा कला महोत्सवात (Kala Ghoda Art Festival)  घडतं. १९९९ पासून काळा घोडा कला महोत्सवाला सुरूवात झाली. महोत्सवात कलाकारांकडून विविध कला सादर केल्या जातात. तसंच हाताने बनवलेल्या विविध गोष्टींची विक्री महोत्सवात केली जाते. विविध प्रांतातील कपडे, दागिने, हातमागाच्या वस्तू आदी वस्तूंनी काळा घोडा परिसर फुलून जातो.

दक्षिण मुंबईमध्ये पार पडणाऱ्या काळा घोडा महोत्सवाचं  (Kala Ghoda Art Festival) सर्वात मोठं आकर्षण म्हणजे लोकनृत्य (Folk dance) आणि विविध शास्त्रीय नृत्यकला. या महोत्सवात भरणारी वेगवेगळी प्रदर्शने लोकांची मनं जिंकून घेतात. मुंबईकरांनी अगदी पहिल्या दिवसापासूनच येथे खरेदीसाठी गर्दी होते. काळा घोडा महोत्सव कलाकारांसाठी विशेष महत्त्वाचा ठरतो. या मगोदावरी घंटाहोत्सवात अनेक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते. आठवडाभर चालणारा हा महोत्सव कलेच्या उपासकांसाठी मोठी पर्वणी असेल. 

काळा घोडा महोत्सवाच्या (Kala Ghoda Art Festival)  निमित्ताने अनेक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी मोठी संधी असते. चित्रकला, फोटोग्राफी, कलात्मक वस्तू आपलं लक्ष वेधून घेतात.दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंच्या साक्षीनं हा कलेचा उत्सव पाहण्यासाठी मुंबई (mumbai) सह भारतातीलच नाहीत तर जगभरातून रसिक येतात. आठवडाभर कलेच्या उपासकांसह रसिकांसाठीही ही मोठी पर्वणी असणार आहे.

काळा घोडा असोसिएशनतर्फे १९९९च्या फेब्रुवारीपासून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात के. दुभाष रस्त्यावर काळा घोडा कला महोत्सव (Kala Ghoda Art Festival) साजरा करण्यास सुरुवात झाली. प्रति वर्षी महोत्सवात पुस्तके (books), हस्तकला, स्वदेशी वस्त्रे, विविध धातूंच्या मूर्ती, तसेच नैसर्गिक साहित्यापासून बनवलेल्या वस्तूंची विक्री करणारे स्टॉल्स असतात. स्टँडअप कॉमेडी, थिएटर, नागरी स्थापत्यकला, दृश्यकला, इत्यादी कलांचे प्रदर्शन व विविध विषयांवर आधारित कार्यशाळांमधून कला-संवाद साधला जातो. 



हेही वाचा -

सिद्धिविनायक मंदिराला ३५ किलो सोनं दान

मुंबईच्या हृदयात वसलेलं १०० वर्षे जुने जपानी मंदिर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा