
वाहतूक विभागाने कल्याण-तळोजा मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे 20 दिवस कल्याण-शीळ रोडवर वाहतूक निर्बंध लागू केले आहेत. 10 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधित वाहतूक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे वाहनधारकांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागणार आहे.
एमएमआरडीए तर्फे मेट्रो 12 (कल्याण-तळोजा) या प्रकल्पाचं काम सुरू आहे. यामुळे कल्याण शीळ रोड येथील सोनरपाडा चौक-मानपाडा चौक या भागात वाहतूक निर्बंध लागू केले आहेत. एमएमआरडीएतर्फे पिलर सिमेंट गर्डर बसवण्याचे काम सुरू असणार आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने या भागात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.
वाहतूक विभागाने स्पष्ट केलं आहे की, कल्याण शीळ रोडवर पत्रीपुल ते रुनवाल चौकदरम्यान मेट्रो 12 म्हणजे कल्याण-तळोजा प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे.
याच प्रकल्पाच्या कामासाठी 10 नोव्हेंबर 2025 ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत कल्याण शीळ रोडवरील सोनारपाडा चौक ते मानपाडा चौकापर्यंत पीलर नंबर 117 ते 189 वर मोठ्या क्रेनच्या साहाय्याने सिमेंट गर्डर ठेवण्याचे काम करण्यात येणार आहे. या कालावधित वाहतूक कोंडी होऊ नये आणि परिसरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्यात आलेत.
कुठे प्रवेश बंद?
कल्याण शीळ रोडवरून कल्याणकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मानपाडा चौक, मेट्रो पीलर नं.201 येथे 'प्रवेश बंद' करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग काय?
सदरची वाहतूक मानपाडा चौक पीलर नं.201 येथून डावीकडे वळण घेऊन सर्व्हिस रोडने सोनारपाडा चौकापर्यंत येथून पुन्हा उजवीकडे वळण घेऊन कल्याण शीळ रोडवरून इच्छीतस्थळी जाता येईल.
कुठे प्रवेश बंद?
कल्याण शीळ रोडवरून कल्याणकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना डी.एन.एस चौक पीलर नं. 144 येथे 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग?
सदरची वाहतूक डी.एन.एस. चौक पीलर नं. 144 येथून डावीकडे वळण घेवून सर्विस रोडने सुयोग हॉटेल, अनंतम रिजन्सी चौक येथून पुन्हा उजवीकडे वळण घेवून कल्याण रोडवरून इच्छितस्थळी जाईल.
हेही वाचा
