Advertisement

सिद्धिविनायक मंदिराला ३५ किलो सोनं दान

एका गणेश भक्तानं श्री सिद्धिविनायकाच्या चरणी तब्बल ३५ किलो सोनं (35 KG Gold) अर्पण केलं आहे. तसंच, या ३५ किलो सोन्याची किंमत १४ कोटी रुपये आहे.

सिद्धिविनायक मंदिराला ३५ किलो सोनं दान
SHARES

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी अनेक भक्त मोठ्या प्रमाणात मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायकाच्या मंदिरात (Siddhivinayak Temple) गर्दी करतात. सिद्धिविनायच्या दर्शनासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण येत असतात. यावेळी भक्तांकडून बाप्पाच्या चरणी सोनं, चांदी दान केलं जातं. त्यानुसार एका गणेश भक्तानं श्री सिद्धिविनायकाच्या चरणी तब्बल ३५ किलो सोनं (35 KG Gold) अर्पण केलं आहे. तसंच, या ३५ किलो सोन्याची किंमत १४ कोटी रुपये आहे.

श्री सिद्धिविनायकाच्या (Siddhivinayak Temple) चरणी ३५ किलो सोनं (GOLD) दान करणाऱ्या गणेश भक्तांचं नाव अद्याप समजलेलं नाही. मात्र, भक्तानं दान केलेल्या सोन्यातून सिद्धिविनायकाचा गाभारा, छत व घुमट सोन्यानं मडविण्यात आलं आहे. तसंच, सिद्धिविनायक मंदिराच्या इतिहासात (Temple History) पहिल्यांदाच इतकं सोनं दान करण्यात आलं आहे, अशी माहिती सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर (Adesh Bandekar) यांनी दिली आहे.

सिद्धिविनायकाचा गाभारा, छत व घुमट सोन्यानं मडविण्यासाठी सिद्धिविनायक मंदिर (Siddhivinayak Temple) बुधवार १५ जानेवारी ते रविवार १९ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आलं होतं. यावेळी सोन्याचा थर चडविण्यात आला असून, गणपती बाप्पाच्या मूर्तीवर सिंदूर लेपन (Sindur Lepan) करण्यात आलं आहे. त्यानंतर सोमवारी म्हणजे २० जानेवारीला बाप्पाचं दर्शन खूल करण्यात आलं आहे.

दरम्यान, भक्तानं दिलेल्या ३५ किलो सोन्यामुळं सिद्धिविनायच मंदिर ट्रस्टचं (Siddhivinayak Temple Trust) उत्पन्नात (Revenue) वाढ झाली आहे. त्यानुसार, ८३ कोटी असलेलं उत्पन्न १०१ कोटी रुपयांपर्यंत वाढलं आहे. सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील अतिशय प्रख्यात गणेश मंदिर आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण या मंदिरात अगदी आवर्जून भेट देत असतात. देश-विदेशातून दर मंगळवारी, महिन्यातील संकष्टीला आणि ६ महिन्यातील अंगारकी चतुर्थीला सिद्धिविनायक मंदिरात मोठी गर्दी करतात.

हेही वाचा - LIC ची होम लोन ऑफर, EMI मध्ये ६ महिन्यांसाठी सूट

यंदा २५ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालवधीत माघी गणेशोत्सव (Maghi Ganeshotsav 2020) सोहळा पार पडणार आहे. माघी गणेशोत्सवाच्या निमित्त सिद्धिविनायक गणेश मंदिरात जय्यत तयारीला केली जात आहे. गणेश जयंतीच्या दिवशी सिद्धिविनायकाची दादर परिसरात पालखी काढण्यात येते. यावेळी अनेक भक्त या पालखीत सहभागी होतात.हेही वाचा -

१५ वर्षानंतर अखेर पोलिसांचा पूर्नविकासाचा प्रकल्प मार्गी लागला

आदित्य ठाकरेंच्या वरळीला सर्वात 'स्वच्छ वार्ड' चा पुरस्कारRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा