COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,79,051
Recovered:
57,33,215
Deaths:
1,18,313
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,637
521
Maharashtra
1,24,398
6,270

१५ वर्षानंतर अखेर पोलिसांचा पूर्नविकासाचा प्रकल्प मार्गी लागला

शांतीसागर पोलिस वसाहतीचा प्रश्न एसआरएच्या माध्यमातून निकाली काढून पोलिसांना चांगली घरे देण्यात यावी, अशी मागणी होत होती.

१५ वर्षानंतर अखेर पोलिसांचा पूर्नविकासाचा प्रकल्प मार्गी लागला
SHARES


तब्बल १५ वर्षानंतर घाटकोपरच्या शांतीसागर पोलिस वसाहतीच्या रखडलेल्या पुनर्वस प्रकल्प गृहनिर्माण मंत्री (Minister of Housing) जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी मार्गी लावला. बुधवारी या वसाहतीच्या पूर्नविकासाची वर्क ऑर्डर (Work order)जारी करण्यात येईल, असे आव्हाड त्यांनी स्पष्ट केले. परिणामी पोलिसांना घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला, तरी शहरातील इतर पोलिस वसाहतीतील परिस्थिती अद्याप ही जैसेथे आहे.

हेही वाचाः- केवायसी अपडेटसाठी तुम्हाला कुणाचा फोन आलायं का ?- सावधान

घाटकोपर(Ghatkoper)च्या रमाबाईनगरलगत असलेल्या शांतीसागर पोलिस वसाहतीचा प्रश्न एसआरएच्या माध्यमातून निकाली काढून पोलिसांना चांगली घरे देण्यात यावी, अशी मागणी होत होती. हा विषय एसआरए(SRA)च्या बैठकीत घेऊन तो आव्हाड यांनी मार्गी लावण्याचे ठरविले आहे. याठिकाणी १७०० घरे बांधण्यात येणार असून, त्यापैकी ९०० घरे पोलिसांनी तत्काळ देण्यात येतील. तसेच म्हाडा(Mhada)च्या नियमानुसार अधिकची ७०० घरे निर्माण करून तीसुद्धा पोलिसांच्या घरांसाठी वर्ग करण्यात येतील, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले. एसआरएचे मुख्याधिकारी दीपक कपूर यांनी यावेळी मंत्र्यांसोबत वसाहतीची पाहणी करून त्यावर वरीलप्रमाणे तोडगा काढला आहे.

हेही वाचाः- पोलिसांसाठी खुशखबर, प्रत्येक जिल्ह्यात उभारली जाणार नेमबाज प्रशिक्षण केंद्र

घाटकोपरच्या रमाईनगर मधील शांतीसागर पोलिस वसाहतीचा जरी प्रश्न सुटला असला. तरी पोलिसांच्या इतर पोलिस वसाहतींची परिस्थिती गंभीर आहे. रविवारी माटुंगा न्यू पोलिस वसाहत (Matunga New Police Colony) A ब्लाँक, रुम नं ३ मध्ये राहणारे पोलिस कर्मचारी संतोष छतिशे यांच्या घराचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत संतोष यांची पत्नी वर्षा या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र अशा घटना महिन्यातून विविध पोलिस वसाहतीत घडत असल्या, तरी त्याची चर्चा ही फक्त दोनच दिवस केली जाते. दोन दिवसानंतर पोलिस कुटुंबियांना पून्हा त्याच अवस्थेत सोडले जाते.

हेही वाचाः- मुंबईत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र शौचालये

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा