केवायसी अपडेटसाठी तुम्हाला कुणाचा फोन आलायं का ?- सावधान

पेटीएम खाते बंद होत असल्याचे सांगत, केवायसी अपडेट करण्यास सांगितली. केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली त्या खात्याची माहिती काढून घेत आरोपींनी त्यांची १ लाख ७० हजारांना फसवणूक केली.

SHARE

पेटीएम(Paytm)  तसेच इतर ॲपसाठी केवायसी अपडेट (KYC update) करायचे आहे, असे सांगून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिसांनी (D.B.Marg Police) मंगळवारी पर्दाफाश केला आहे. नरशी सुथार, नंदकिशोर सुथार आणि पुखराज सुथार  अशी या आरोपींची नावे आहेत. फसवणूकीच्या रक्कमेतून या चोरट्यांनी ७० मोबाइल खरेदी केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.  या तिघांनी अशा प्रकारे अनेकांना गंडवले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

हेही वाचाः- मुंबई विद्यापीठाकडून पेपरलेस परीक्षेचं नियोजन

मूळचे झारखंड(Jharkhand)चे असलेले तिन्ही आरोपी नागरिकांचे मोबाइल (mobile) नंबर मिळवत त्यांना केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली फोन करून फसवणूक करायचे. नुकतेच या तिघांनी विलेपार्ले (Ville Parle) येथे राहणारे व्यापारी अनिल शाह यांना लक्ष केले. शहा यांना फोन करून आरोपींनी त्यांचे पेटीएम खाते बंद होत असल्याचे सांगत, केवायसी अपडेट करण्यास सांगितली. केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली त्या खात्याची माहिती काढून घेत आरोपींनी त्यांची १ लाख ७० हजारांना फसवणूक केली.

हेही वाचा- मुंबई पोलीस घोड्यांवरून घालणार गस्त…

शहा यांनी नोंदवलेल्या तक्रानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात झारखंड येथून शहा यांना गंडा घालण्यात आल्याचे तपासात पुढे आले. त्यानुसार पोलिसांनी झारखंड येथून तिन्ही आरोपींना अटक केली. तिघांच्या चौकशीत फसवणुकीतून मिळालेल्या पैशाचे तिघांनी ७० मोबाइल खरेदी केले. तर उर्वरित रकमेतून बिगबाजार (Big Bazaar ) कॅश व्हाऊचर (Cash voucher) खरेदी करण्यात आल्याचे समजले. हा धागा पकडून पोलिसांनी नरशी सुथार, नंदकिशोर सुथार आणि पुखराज सुथार या तिघांना अटक केली. बहुदा त्यांनी याच पैशातून मोबाइल विक्रीचा धंदा सुरू केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.

हेही वाचाः- एसी लोकलमध्येही आता खरेदी करता येणार

काही दिवसांपूर्वीच डोंगरी (Dongri) त राहणाऱ्या व्यापाऱ्याच्या घरी साप आढळून आल्याने त्यांनी गुगल (Google)वर सर्प मित्राचा नंबर शोधला. त्यावर फोन केल्यानंतर त्यांनी प्रोसिजरच्या नावाखाली त्यांच्याकडून मोबाइलवर एक लिंक पाठवून त्या लिंकवरील माहिती आणि १० रुपये फी भरण्यास सांगितली. व्यापाऱ्याने ते केल्यानंतर एका मागोमाग एक त्याच्या खात्यातून पैसे काढण्यात आल्याचे मेसेज येऊ लागले.सायबर चोरट्यांनी व्यापाऱ्याला तब्बल ३६ हजारांना जागेवरच चुना लावला. त्यामुळे अशा भामट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

हेही वाचाः- सापाच्या नादात झालं अकाऊंट ‘साफ’


संबंधित विषय
ताज्या बातम्या