Advertisement

अखेर विलेपार्ले पोलिस ठाण्याला हक्काची जागा मिळाली

मागील अनेक दिवसांपासून विलेपार्ले पोलिस कंटेनरमधील कार्यालयात बसून या परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळत होते. अखेर वरिष्ठांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर त्यांना नवीन पोलिस ठाणे मिळालं आहे. रविवारी मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नवीन पोलिस ठाण्याचं उद्घाटन झालं.

अखेर विलेपार्ले पोलिस ठाण्याला हक्काची जागा मिळाली
SHARES

विमानतळापासून हाकेच्या अंतरावर आणि एका कोपऱ्यात कंटेनरमध्ये बसलेल्या विलेपार्ले पोलिसांना अखेर हक्काचं आणि सुसज्ज पोलिस ठाणे मिळालं आहे. मागील अनेक दिवसांपासून विलेपार्ले पोलिस कंटेनरमधील कार्यालयात बसून या परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळत होते. अखेर वरिष्ठांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर त्यांना नवीन पोलिस ठाणे मिळालं आहे. रविवारी मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नवीन पोलिस ठाण्याचं उद्घाटन झालं. 


सुसज्ज पोलिस ठाणे

विमानतळाजवळील एका मोकळ्या जागेत ३ ते ४ कंटेनर उभे करून तिथं विलेपार्ले पोलिसांना जागा देण्यात आली होती. कंटेनरमध्ये सुरू असलेलं मुंबईतील हे पहिलंच पोलिस ठाणे होतं. अखेर गृहखात्याने जिविके कंपनीच्या सहाय्याने विलेपार्ले पोलिसांना हक्काची जागा दिली आहे. या नवीन ४ मजली इमारतीतील पोलिस ठाण्यात ४० हून अधिक संगणक, आरामासाठी स्वतंत्र रूम, वायफाय सुविधा, अत्याधुनिक उपाहारगृह, पार्किंगसाठी मोठं मैदान, अग्नी प्रतिबंधक यंत्रणा अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.


२५ कोटींचा निधी हवा

हे नवीन पोलिस ठाणे मुंबईतील पहिलं अत्याधुनिक पोलिस ठाणे आहे. याच धर्तीवर मुंबईतील इतर पोलिस ठाणे आधुनिक करण्यासाठी राज्य सरकारतर्फे जिल्हा नियोजन समितीतून २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा पालकमंत्री तथा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी केली. 


पर्यावरणपूरक इमारत

विलेपार्लेतील या अत्याधुनिक इमारतीचे रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. अवघ्या १० महिन्यांच्या कालावधीत ही ४ मजली इमारत उभारण्यात आली आहे. साडे बारा हजार चौरस फुटांमध्ये ही इमारत उभारण्यात आली आहे. विशेष म्हणजे या इमारतीचं बांधकाम पर्यावरणपूरक असल्यामुळे दिवसा दिवे किंवा पंखे लावण्याची गरज भासणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.हेही वाचा-

भोजपुरी सुपरस्टार रवी किशनला बिल्डरने लावला चुना

इमारतींवर स्टंटबाजी करणाऱ्या ६ परदेशी नागरिकांची मायदेशात रवानगीRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा