इमारतींवर स्टंटबाजी करणाऱ्या ६ परदेशी नागरिकांची मायदेशात रवानगी

सोमवारी दुपारी या इमारतीचा सुरक्षा रक्षक इमारतीचा पाणीपुरवठा तपासण्यासाठी टेरेसवर गेला असता, त्याने ही स्टंटबाजी बघितली. त्यानंतर त्याने तात्काळ यासंदर्भातील माहिती इमारतीच्या रहिवाशांना दिली. रहिवाशांनी देखील वेळ न दवडता या स्टंटबाजांविरोधात दादर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

इमारतींवर स्टंटबाजी करणाऱ्या ६ परदेशी नागरिकांची मायदेशात रवानगी
SHARES

प्रभादेवी रेल्वे स्थानकानजीक एका इमारतीच्या टेरेसवर जीवघेणी स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ मंगळवारी चांगलाच व्हायरल झाला. याप्रकरणी इमारतीतील रहिवाशांनी दादर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ या स्टंटबाजांचा शोध घेऊन ६ जणांना ताब्यात घेतलं आहे. हे सहाही जण परदेशी नागरिक असून त्यांची रवानगी मायदेशात करण्यात आली आहे.


नकळत स्टंटबाजी

प्रभादेवी स्थानकापासून जवळच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ही १४ मजल्यांची 'एसआरए' इमारत आहे. या इमारतीत आणि बाजूच्या इमारतीत एकूण २२ फुटांचं अंतर आहे. हे ६ जण कुणाच्याही नकळत एका इमारतीच्या टेरेसवरून दुसऱ्या इमारतीच्या टेरेसवर उडी मारत होते. एका अज्ञात व्यक्तीने ही स्टंटबाजी मोबाइलवरून शूट करून ती सोशल मीडियावर टाकताच हा व्हिडिओ व्हायरल झाला.


रहिवाशांकडून तक्रार

सोमवारी दुपारी या इमारतीचा सुरक्षा रक्षक इमारतीचा पाणीपुरवठा तपासण्यासाठी टेरेसवर गेला असता, त्याने ही स्टंटबाजी बघितली. त्यानंतर त्याने तात्काळ यासंदर्भातील माहिती इमारतीच्या रहिवाशांना दिली. रहिवाशांनी देखील वेळ न दवडता या स्टंटबाजांविरोधात दादर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.


मायदेशी रवानगी

पोलिसांनी या व्हिडिओवरून ६ जणांचा माग काढल्यावर ते परदेशी नागरिक असल्याचं पुढं आलं. पर्यटनासाठी मुंबईत आलेले हे सहाही जण ताज हाॅटेलमध्ये थांबले होते. तिथून दादर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. परदेशात हा प्रकार 'रुफ टाॅप जंप' म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु भारतात मात्र असे स्टंट करणं कायद्याने गुन्हा आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या तिघांनाही मायदेशी रवाना करण्यात आलं.



हेही वाचा-

बँकेतल्या भुरट्या चोरांपासून सावधान ! नाहीतर असं होईल

चाइल्ड पाॅर्नोग्राफी बघाल, तरी ५ वर्षे तुरूंगात जाल!



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा