चाइल्ड पाॅर्नोग्राफी बघाल, तरी ५ वर्षे तुरूंगात जाल!

केंद्राने पाॅस्को कायद्यात केलेल्या सुधारीत प्रस्तावानुसार चाइल्ड पाॅर्नोग्राफीचा व्यावसायिक वापर करणं, व्हिडिओ बघणं किंवा बाळगणं किंवा तो वितरीत करणं या गुन्ह्यात दोषी सिद्ध झाल्यास संबंधिताला दंड तसंच किमान ५ वर्षांचा तुरूंगवास होऊ शकतो. हा गुन्हा आजीमनपात्र असून या गुन्ह्यात दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास ७ वर्षांपर्यंत तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते.

चाइल्ड पाॅर्नोग्राफी बघाल, तरी ५ वर्षे तुरूंगात जाल!
SHARES

आजकाल कुठल्याही पाॅर्न इंटरनेट साइटवर अल्पवयीन मुले आणि किशोर अवस्थेतील मुलांचे अश्लिल व्हिडिओ सहज उपलब्ध होतात. या प्रकराला आळा घालण्यासाठी, तसंच लहान मुलांच्या लैंगिक शोषणाला प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकारने चाइल्ड पाॅर्नोग्राफीवर कडक पाऊल उचललं आहे. केंद्राने पाॅस्को कायद्यात केलेल्या सुधारीत प्रस्तावानुसार चाइल्ड पाॅर्नोग्राफीचा व्यावसायिक वापर करणं, व्हिडिओ बघणं किंवा बाळगणं किंवा तो वितरीत करणं या गुन्ह्यात दोषी सिद्ध झाल्यास संबंधिताला दंड तसंच किमान ५ वर्षांचा तुरूंगवास होऊ शकतो. हा गुन्हा आजीमनपात्र असून या गुन्ह्यात दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास ७ वर्षांपर्यंत तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते.


शिक्षेची तरतूद

सध्याच्या कायद्यानुसार गुन्ह्यात दोषीला दंड आणि ३ वर्षांपर्यंत तुरूंगवास किंवा दोन्हींची तरतूद आहे. या कायद्यात सुधारणा करून या गुन्ह्यांत पहिल्यांदा दोषी आढळल्यास ३ ते ५ वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. तर एखादा आरोपी याच गु्न्ह्यात दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास त्याला ५ ते ७ वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.


व्हिडिओ बाळगणं धोक्याचं

सुधारीत तरतूदीनुसार चाइल्ड पाॅर्नोग्राफीचे फोटो, व्हिडिओ जवळ बाळगल्यास किंवा व्हाॅट्सअॅपवरून दुसऱ्याला हस्तांतरीत केल्याचं उघड झाल्यास कठोर दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.


प्रस्तावाला मंजुरी मिळणं बाकी

केंद्र सरकारने तयार केलेल्या प्रस्तावाला कायदा मंत्रालयाची मंजूरी मिळणं बाकी आहे. पुढच्या आठवड्यात या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या मंजुरीनंतर हा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठवण्यात येईल.हेही वाचा-

पैशांसाठी केली पत्नीचीच बदनामी

एकतर्फी प्रेमातून ५ वर्ष पाठलाग, तरूणाला अटकRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा