एकतर्फी प्रेमातून ५ वर्ष पाठलाग, तरूणाला अटक

एके दिवशी आरोपीने तक्रारदार तरुणीच्या मैत्रिणीला आपण तिच्यावर एकतर्फी प्रेम करत असल्याचं सांगितलं. मात्र, तिने सचिनला तिच्यापासून लांब राहण्याचा सल्ला देत, तरुणीला याची माहिती दिली.

एकतर्फी प्रेमातून ५ वर्ष पाठलाग, तरूणाला अटक
SHARES

एकतर्फी प्रेमातून मागील पाच वर्षांपासून फिल्म प्रोडक्शन कंपनीच्या प्रोड्युसर तरुणीचा पाठलाग करत, तिच्याविषयी फेसबुक आणि इतर सोशल मिडियावर माहिती टाकणाऱ्या विकृतास टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे. सचिन भानुदास चव्हाण (३८) असं या आरोपीचे नाव असून न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.


सोशल मिडियावर फाॅलो 

कुर्लाच्या टिळकनगर काॅलनी परिसरात तक्रारदार तरुणी तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तरूणीची फिल्म प्रोडक्शन कंपनी अाहे. मागील पाच वर्षांपासून त्याच परिसरात राहणारा सचिन चव्हाण हा तिच्या न कळत पाठलाग करत होता. तसंच तिला फेसबुक आणि इतर सोशल मिडियावरही फाॅलो करत  होता. तसंच तो तरुणीकडे एकटक अश्लील नजरेहीने पहायचा. एके दिवशी आरोपीने तक्रारदार तरुणीच्या मैत्रिणीला आपण तिच्यावर एकतर्फी प्रेम करत असल्याचं सांगितलं. मात्र, तिने सचिनला तिच्यापासून लांब राहण्याचा सल्ला देत, तरुणीला याची माहिती दिली. त्यानंतर सचिनला तरूणी आणि तिच्या घरातल्यांनी समजही दिली. 


मेसेंजरवर मेसेज 

मात्र सचिन ऐकण्याच्या पलिकडे गेला होता. तो तिला वारंवार फेसबुकच्या मेसेंजरवर मेसेज पाठवून त्रास देत होता. त्याचबरोबर त्याने तक्रारदार तरुणी आणि तिच्या मैत्रिणींविषयी अनेक मजकूर सोशल मिडियावर टोपण नावाने टाकले होते. याबाबतची महिती तरूणाला मैत्रिणीने सांगितली. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने सचिन विरोधात टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. त्यानुसार पोलिसांनी सचिनला ३५४ (ड), ५०९ भा.द.वि. कलमांतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली आहे. 



हेही वाचा -

घातक शस्त्र तस्करीप्रकरणी अमित शाह अटकेत

बोगस गुणपत्रिकेतील मुख्य आरोपी अखेर अटकेत




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा