पैशांसाठी केली पत्नीचीच बदनामी

कामावर जाताना रस्त्यात अडवून तिच्याकडे पैशांची मागणी करायचा. पैसे न दिल्यास अॅसिड टाकून विद्रूप करण्याची धमकीही देऊ लागला. पैसे देण्यास पत्नी तयार नसल्याने त्याने तिचा मोबाइल नंबर, फोटो अाणि अश्लील मजकूर फेसबुकवर टाकून तिची बदनामी करण्यास सुरूवात केली.

पैशांसाठी केली पत्नीचीच बदनामी
SHARES

पैशांसाठी पत्नीची बदनामी करणाऱ्या ३० वर्षीय तरुणास कुर्ला पोलिसांनी अटक केली. पत्नी अल्पवयीन असताना आरोपीने तिच्यावर अत्याचार करत लग्नास नकार दिला. तरुणीने पोलिसात धाव घेतल्यानंतर आरोपीने लग्न करत पैशांसाठी तगादा लावला. पैसे मिळत नाहीत म्हणून त्याने पत्नीची सोशल मिडियावर बदनामी केली. 


लग्नाचं अामिष

कुर्लाच्या अंजुमन संकुलाजवळ पीडित विवाहिता आपल्या कुटुंबियांसोबत राहते. २०१३ मध्ये ती अल्पवयीन असताना अारोपीने तिला स्वतःच्या जाळ्यात ओढले. प्रेमसंबधातून लग्न करण्याचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबधही ठेवले. कालांतराने ही बाब घरी समजल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र, तो लग्न करण्यास नकार देत असल्यामुळे पीडितेने पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी पोस्कोचा गुन्हा नोंदवत त्याला अटक केली.


तडजोडीअंती लग्न

तडजोडीअंती त्याने लग्नास होकार देत तरुणीशी लग्न केले. मात्र लग्नानंतर सासरच्या मंडळींनी तरुणीस त्रास देण्यास सुरूवात केली. नवऱ्याला सोडवण्यासाठी ९ लाख रुपये खर्च झाल्याचे सांगत सासूने तिच्यावर केरोसिन ओतून पेटवण्याचा प्रयत्न केला. १९ वर्षीय विवाहितेला हे सर्व सहन न झाल्याने ती पुन्हा घरी परतली. 


फेसबुकवर फोटो, अश्लील मजकूर

मानसिक धक्क्यातून सावरत तिने पुन्हा नवीन आयुष्याला सुरूवात केली. गोवंडी येथे नोकरी करून ती घरातल्यांना मदत करत होती. मात्र, तिच्या पतीने पैशांसाठी तिचा पाठलाग सुरू केला. कामावर जाताना रस्त्यात अडवून तिच्याकडे पैशांची मागणी करायचा. पैसे न दिल्यास अॅसिड टाकून विद्रूप करण्याची धमकीही देऊ लागला. पैसे देण्यास पत्नी तयार नसल्याने त्याने तिचा मोबाइल नंबर, फोटो अाणि अश्लील मजकूर फेसबुकवर टाकून तिची बदनामी करण्यास सुरूवात केली. या प्रकरणी पत्नीने कुर्ला पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पतीस अटक केली असून त्याला न्यायालयाने ३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 



हेही वाचा - 

एकतर्फी प्रेमातून ५ वर्ष पाठलाग, तरूणाला अटक

घातक शस्त्र तस्करीप्रकरणी अमित शाह अटकेत




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा