Advertisement

एसी लोकलमध्येही आता खरेदी करता येणार

उपनगरी लोकलमध्ये आता प्रथमच शॉपिंग ऑन व्हील्स (Shopping on wheels) ही योजना सुरू केली जाणार आहे. त्यामुळे लोकलमध्ये प्रवाशांना वस्तू खरेदी करता येणार आहेत. चर्चगेट (Churchgate)-विरार (Virar) या एसी लोकल ( AC Local) मध्ये ही योजना सुरू केली जाणार आहे.

एसी लोकलमध्येही आता खरेदी करता येणार
SHARES

उपनगरी लोकलमध्ये आता प्रथमच शॉपिंग ऑन व्हील्स (Shopping on wheels) ही योजना सुरू केली जाणार आहे. त्यामुळे लोकलमध्ये प्रवाशांना विविध वस्तू खरेदी करता येणार आहेत. चर्चगेट (Churchgate)-विरार (Virar) या एसी लोकल ( AC Local) मध्ये ही योजना सुरू केली जाणार आहे. मागील वर्षी पश्चिम रेल्वे (western railway) नं लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये शॉपिंग ऑन व्हील्स योजना सुरू केली होती. 

शॉपिंग ऑन व्हील्स योजनेत पश्चिम रेल्वे (western railway) नं विक्रेत्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे.  हे विक्रेते चर्चगेट-विरार या एसी लोकलमध्ये ट्रॉली घेऊन फिरणार आहेत. ही ट्रॉली तीन फूट उंच आणि एक फूट रुंद असेल. या विक्रेत्यांना गणवेश दिला जाणार असून त्यांच्याकडे ओळखपत्र असणार आहे. चार विक्रेते लोकलमध्ये दोन ट्रॉली घेऊन फिरणार आहेत. त्यांच्याकडे वस्तूंची माहिती देणारे पत्रकही असणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत एसी लोकल ( AC Local) मध्ये वस्तू विकल्या जाणार आहेत. 

प्रवाशांना त्वचा आणि केसांची निगा राखणारी उत्पादनं, कॉस्मेटिक्स, आरोग्याशी संबंधित उत्पादने, मिठाई, लॅपटॉप (laptop), मोबाइल (mobile) अॅक्सेसरीज (Accessories), लहान खेळणी (small toys) आणि स्टेशनरी (stationery) आदी वस्तू  खरेदी करता येणार आहेत. सध्या लोकलमध्ये स्टेशनरी, खाद्यपदार्थ विकले जातात. पण लोकलमध्ये वस्तूंची किंवा खाद्यपदार्थांची विक्री करणं बेकायदेशीर आहे.

शॉपिंग ऑन व्हील्स (Shopping on wheels) योजनेत सौंदर्यप्रसाधन, घरातील आणि किचन (kitchen) मधील साहित्य आणि फिटनेसचं साहित्य आदी वस्तू विकता येणार आहेत. तंबाखू (Tobacco), गुटखा (gutkha) आणि सिगारेट (cigarettes)या वस्तू विकता येणार नाहीत. सामानाची विक्री करताना सेल्समन (Salesman) ना मोठ्या आवाजात सामानाची विक्री करता येणार नाही. तसंच प्रवाशांना वस्तू घेण्यासाठी जबरदस्तीही करता येणार नाही. 

मागील वर्षीच्या जानेवारीत पश्चिम रेल्वे (western railway) तर्फे लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमध्ये शॉपिंग ऑन व्हील्स ही योजना सुरू करण्यात आली होती. पश्चिम रेल्वेच्या १६ मेल आणि एक्सप्रेसमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे.  ही सुविधा उपलब्ध करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून एचबीएन प्रायव्हेट लिमिटेड (HBN Private Limited) या कंपनीला ५ वर्षांसाठी ३.६६ कोटी रुपयांमध्ये कंत्राट दिलं आहे.  


हेही वाचा - 

इंधन वाचविणाऱ्या चालकांचा एसटी महामंडळ करणार सत्कार

मुंबईकरांचा दररोज दीड तास वाहतूककोंडीत वाया!




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा