Advertisement

इंधन वाचविणाऱ्या चालकांचा एसटी महामंडळ करणार सत्कार

एसटी महामंडळामध्ये (Maharashtra State Road Transport Corporation) इंधन बचत अभियान सुरू करण्यात आलं आहे.

इंधन वाचविणाऱ्या चालकांचा एसटी महामंडळ करणार सत्कार
SHARES

एसटी महामंडळामध्ये (Maharashtra State Road Transport Corporation) इंधन बचत अभियान सुरू करण्यात आलं आहे. या अभियानामध्ये सर्वाधिक इंधनाची (Diesel) बचत करणाऱ्या चालकांचा (Driver) सत्कार करण्यात येणार आहे. तसंच, ‘करा बचत डिझेलची, होईल प्रगती एसटीची' अशी घोषवाक्यं वापरून एसटी महामंडळ जनजागृती करत आहे. भारत सरकारच्या पेट्रोलिअम व प्राकृतिक गॅस मंत्रालयाच्या निर्देशानुसार एसटीमध्ये १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी अखेरीपर्यंत इंधन बचत अभियान राबविण्यात येत आहे.

एसटी महामंडळात (Maharashtra State Road Transport Corporation) तब्बल १८ हजार ५०० बस माध्यमातून दररोज ६६ लाख प्रवाशांची (passengers) सुरक्षित वाहतूक करते. या वाहतुकीसाठी दररोज एसटीला १२ लाख १२ हजार लीटर डिझेलची (Diesel) आवश्यकता लागते. हे डिझेल एसटीला इंडियन आॅइल (Indian Oil Corporation) व भारत पेट्रोलिअम (Bharat Petroleum) या भारत सरकारच्या अंगीकृत कंपन्यांद्वारे दिले जाते.

यंदा मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ झाल्यानं एसटी महामंडळाच्या चालकांना इंधन बचत अभियानातून डिझेल वाचविणं, पर्यायानं इंधनावरील अनावश्यक खर्च (Expence) टाळण्याचं समुपदेशन करण्याबरोबरच, पारंपरिक इंधनाच्या ज्वलनामुळं होणारे वातावरणातील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनं सुरक्षित व सुव्यवस्थित वाहन चालविण्याचे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत इंधन बचती संबंधीच्या जनजागृती, चालकांना व्याख्यानं, माहितीपट, भित्तीपत्रकं, आवाहन पत्रकं या माध्यमातून प्रबोधन व प्रोत्साहित करण्यात येत आहे. या अभियान काळात जास्तीतजास्त इंधन बचत करणाऱ्या चालकांचा सत्कार आगार पातळीवर करण्यात येणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा