Advertisement

मुंबईकरांचा दररोज दीड तास वाहतूककोंडीत वाया!

वाहतूककोंडीत अडकून मुंबईकरांचे दररोज सरासरी ८५ मिनिटे वाया जात आहेत. सकाळ आणि खासकरून सायंकाळच्या वेळेत ९० टक्क्यांहून अधिक प्रवाशांना या वाहतूककोंडीचा (traffic jam) सामना करावा लागत असल्याचं हा अहवाल सांगतो.

मुंबईकरांचा दररोज दीड तास वाहतूककोंडीत वाया!
SHARES

वाहतूककोंडीची (Mumbai traffic) समस्या मुंबईकरांसाठी नवीन नाही. इथं कुठल्याही वेळेत कुठल्याही रस्त्यावर वाहनांची रांग लागलेली दिसून येते. या वाहतूककोंडीत अडकून उशीरा मस्टर गाठणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. परंतु वाहतूककोंडीत दररोज आपले किती तास वाया जातात याचा हिशेब मात्र कुणी ठेवत नसेल. पण एका अहवालातून हे सत्य बाहेर आलं आहे. या अहवालानुसार वाहतूककोंडीत अडकून मुंबईकरांचे दररोज सरासरी ८५ मिनिटे वाया जात आहेत.  

सकाळ आणि खासकरून सायंकाळच्या वेळेत ९० टक्क्यांहून अधिक प्रवाशांना या वाहतूककोंडीचा (traffic jam) सामना करावा लागत असल्याचं हा अहवाल सांगतो. हा अहवाल मुंबई शहरातील खासगी कार, बाईक, सार्वजनिक टॅक्सी-, अॅपबेस्ड कॅब इ. वाहनांतून प्रवास करणाऱ्या प्रत्येकी १२०० प्रवाशांची मतं जाणून घेत तयार करण्यात आला आहे.  

हेही वाचा- अवजड वाहनांविरोधात १० महिन्यांत 'इतक्या' तक्रारी

कुठे होते वाहतूककोंडी?

  • मुंबईत एका किलोमीटरमागे ५३० कार धावतात
  • तर दिल्लीत एका किलोमीटरमागे १०८ कार धावतात
  • पश्चिम द्रूतगती महामार्ग (western express highway), एस.व्ही.रोड (s. v. road) वर सर्वाधिक वाहतूककोंडी 
  • मुंबईत १,१०० किमीचे रस्ते आणि ६ हजार नव्या बसची आवश्यकता   

या अहवालानुसार वाहतूककोंडीमुळे (Mumbai traffic) प्रवाशांचा वेळ वाया जाण्यासोबतच आरोग्याच्या समस्या उद्धवत असल्याचं ४२ टक्के जणांनी सांगितलं. तर ४६ टक्के लोकांनी वाहतूककोंडीमुळे आपलं दैनंदिन काम करण्यात अडचणी येत असल्याचं सांगितलं आणि ५२ टक्के लोकांनी आपल्या उत्पादन क्षमतेवर परिणाम झाल्याचं स्पष्ट केलं. वाहतूककोंडीमुळे (traffic jam) अतिरिक्त खर्च होत असल्याचं ७५ टक्क्यांचं मत आहे. यामुळे २७ टक्के कारचालक आणि १८ टक्के बाईकचालकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे (public transport) वळण्याची तयारी दाखवली आहे. 

हेही वाचा- पश्चिम रेल्वेवर धावणार पहिली खासगी तेजस एक्स्प्रेस

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा