Advertisement

पश्चिम रेल्वेवर धावणार पहिली खासगी तेजस एक्स्प्रेस

पश्चिम रेल्वे मार्गावरील पहिली खासगी तत्त्वावरील तेजस एक्स्प्रेस अहमदाबाद येथून धावणार आहे.

पश्चिम रेल्वेवर धावणार पहिली खासगी तेजस एक्स्प्रेस
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवासा करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील पहिली खासगी तत्त्वावरील तेजस एक्स्प्रेस अहमदाबाद येथून धावणार आहे. १७ जानेवारी रोजी ही एक्स्प्रेस अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान धावणार आहे. रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) यांच्यावतीनं ही दुसरी खासगी एक्स्प्रेस धावणार आहे.

दिल्ली ते लखनऊ देशातील पहिली तेजस एक्स्प्रेस खासगी गाडी ४ आॅक्टोबर २०१९ रोजी धावली होती. त्यानंतर आता मुंबई-अहमदाबाद ही तेजस एक्स्प्रेस धावणार आहे. खासगी तेजस एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुंदरी आणि रेल्वे कर्मचारी हे गुजराती वेशभूषेत दिसणार आहेत.

तेजस एक्स्प्रेसमधील प्रवाशांना महाराष्ट्र आणि गुजराती थाळी मिळणार आहे. यामध्ये गुजराती डाळ, गुजराती कढी, लसनिया बटाटा भाजी, फाफडा, जिलेबी असे गुजराती पदार्थ मिळणार आहेत. तसंच मांसाहारी पदार्थांसह बटाटा भाजी, बटाटावडा, कोथिंबिर वडी, श्रीखंड, कांदेपोहे या महाराष्ट्रातील प्रसिद्ध पदार्थांची चवही चाखता येणार आहे.

मुंबई ते अहमदाबाद मार्गावर धावणारी डबल डेकर एक्स्प्रेसची रचना इतर एक्स्प्रेसच्या तुलनेत वेगळी आहे. या गाडीला वर-खाली आसनं असल्यामुळे उभे राहण्यास प्रवाशांना अडचणी येत आहेत. तसंच, प्रवाशांना साहित्य ठेवण्यासाठी अरुंद रेक आहे. मुंबई-अहमदाबाद एसी डबल डेकरमधून प्रवास करताना झटके लागत आहेत. त्यामुळं या गाडीला एलएचबी डबे लावण्याची मागणी प्रवाशांनी केली.

मुंबई आणि गुजरातच्या प्रवाशांसाठी एसी डबल डेकर एक्स्प्रेस खूप उपयुक्त आहे. या गाडीमध्ये प्रवासी क्षमता अधिक आहे. यासह प्रवाशांची संख्याही खूप मोठी आहे. मात्र, प्रवाशांना सामान ठेवण्याची जागा खूप कमी असल्यानं अनेक अडचणी येत आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा