अवजड वाहनांविरोधात १० महिन्यांत 'इतक्या' तक्रारी

अवजड वाहनांविरोधात प्रादेशिक परिवहन विभागानं (आरटीओ) दाखल केलेल्या तक्रारीची आकडेवारी समोर आली आहे.

अवजड वाहनांविरोधात १० महिन्यांत 'इतक्या' तक्रारी
SHARES

अवजड वाहनांविरोधात प्रादेशिक परिवहन विभागानं (आरटीओ) दाखल केलेल्या तक्रारीची आकडेवारी समोर आली आहे. अवजड वाहनांविरोधात मागील १० वर्षात राज्यभरात ३ हजार ५८२ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करून रस्ते खराब करणारे वाहनचालक व मालक यांच्याविरुद्ध आरटीओकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, या तक्रारींपैकी केवळ ४६९ प्रकरणांत पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयानं दिलेल्या माहितीतून समोर येत आहे.

अवजड वाहनांमधून वस्तू आणि मालांची वाहतूक सतत होत असते. त्याची वाहतूक करण्याचं वेगवेगळं प्रमाण 'आरटीओ'कडून वाहनांना ठरवून दिलं जातं. मालवाहनांची आरटीओत नोंदणी झाल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्रावरच त्याची क्षमता नमूद केली जाते. परंतु, राज्यात क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आलं असून, त्यामुळं रस्त्यांचं नुकसान होण्याबरोबरच अपघात आणि वाहतूक कोंडीही होते.

या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत 'प्रिव्हेन्शन ऑफ डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी अ‍ॅक्ट १९८४'च्या तरतुदीनुसार संबंधित वाहनचालकांवर कारवाई करण्याबाबत नमूद करण्यात आलं होतं. उच्च न्यायालयानं २३ ऑगस्ट २०१७ रोजी सुनावणीदरम्यान आदेश दिल्यानंतर परिवहन आयुक्त कार्यालयानं २१ डिसेंबर २०१८ पासून कारवाईला सुरुवात केली.

मागील १० महिन्यांत राज्यात आरटीओ कार्यालयांनी ३ हजार ५८२ तक्रारी केल्या आहेत. तसंच, रस्ते खराब केल्याप्रकरणी केवळ ४६९ गुन्हे स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयानं दिली आहे.

सर्वाधिक गुन्हे पुणे विभागात २८३, जळगाव ३०, सिंधुदुर्ग २२, सोलापूर ४९, अकोला ३९ गुन्हे दाखल आहेत. त्या तुलनेत मुंबईत २४१ तक्रारी आल्यानंतरही एकही गुन्हा दाखल झालेला नाही. कोल्हापूर विभागातही ३३१ तक्रारी, सातारात २४४ यासह पेण, अहमदनगर, औरंगाबाद, लातूर, नागपूर शहर व ग्रामीण यासह अन्य काही भागांत अवजड वाहनांविरोधात तक्रारी असून पोलिसांत गुन्हे दाखल झालेले नाही आहेत.



हेही वाचा -

सेन्सेक्स ४२००० हजार अंकांवर

मुंबईत महिलांवरील अत्याचारात वाढ



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा