मुंबईत महिलांवरील अत्याचारात वाढ


मुंबईत महिलांवरील अत्याचारात वाढ
SHARES

मुंबईत २०१९ या वर्षात घडलेल्या सर्व गुन्ह्यांची माहिती समोर येत आहे. मुंबईत तब्बल ४१९३१ गुन्हे दाखल झाले असून, यापैकी २८८०२ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती मिळते. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोनं २०१८ची देशभरातील गुन्ह्यांची आकडेवारी नुकतीच जाहीर केली. त्यानंतर, मुंबईतील २०१९ची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार, महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांत ५६० नं वाढ झाली आहे.

२०१९ मध्ये महिलांचे विनयभंग, बलात्कार, अपहरण असे एकूण ६४३८ गुन्हे घडले आहेत, तर २०१८ मध्ये ही संख्या ५९७८ इतकी होती. २०१८च्या तुलनेत बलात्कारांच्या गुन्ह्यांमध्ये १२६ तर विनयभंगाचे गुन्हे ९२ नं वाढले आहेत. बलात्काराच्या १०१५ गुन्ह्यांमध्ये ६२२ गुन्हे अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचे आहेत. ही आकडेवारी लक्षात घेता मुंबईतील महिला अजूनही सुरक्षित नसल्याचं चित्र आहे.

महिलांवरील अत्याचार गुन्ह्यांच्या आरोपींमध्ये ओळखीच्या आरोपींचं प्रमाण अधिक आहे. तसंच, वाढत्या जनजागृतीमुळं महिला, अल्पवयीन मुलींचे पालक तक्रार करण्यासाठी येत असल्यानं गुन्ह्यांची आकडेवारी वाढल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

अल्पवयीन मुलींच्या अपहरणामध्ये २०१९ मध्ये घट झाली असून, २०१९ मध्ये अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे १३३४ गुन्हे दाखल झाले आहेत. ही संख्या २०१८ मध्ये १३३९ इतकी होती. २०१७ मध्ये अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे १२७४ गुन्हे दाखल झाले होते.

मुंबईतील गुन्हे

वर्ष गुन्हे उकल
२०१९ ४१९३१२८८०२
२०१८ ४१९०१ २८८१२
२०१७ ३९८७२ २५४१७

वर्षागणिक आकडेवारी

गुन्हे २०१९ 
२०१८ 
२०१७
हत्या १६५ 
१६४ 
१२७
सोनसाखळी २१ 
३१ 
३१
घरफोडी १५७ 
१७१ 
१६९
चोरी २०५८ 
२२४४ 
२४०९
वाहनचोरी 
२६९३ 
३२०३ 
३०१२
बलात्कार 
१०१५ 
८८९
७५१
विनयभंग 
२६७८ 
२५८६ 
२२६८

महिला अत्याचार गुन्हे

वर्ष 
गुन्हे 
उकल
२०१७ 
५४२५ 
४३५३
२०१८ 
५९७८ 
४८१५
२०१८ 
६४३८ 
५३२८

पोस्को अंतर्गत दाखल गुन्हे

वर्ष 
२०१९ 
२०१८ 
२०१७
गुन्हे 
१३१४ 
१२१० 
११२४

अपहरणाचे गुन्हे

वर्ष 
२०१९ 
२०१८ 
२०१७
प्रौढ 
१५ 
१२ 
१८
अल्पवयीन  
१३३४ 
१३३९ 
१२७४



हेही वाचा -

सेन्सेक्स ४२००० हजार अंकांवर

‘तान्हाजी’ करमुक्त करा, देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा