Advertisement

सेन्सेक्स ४२००० हजार अंकांवर

सेन्सेक्स आणि निफ्टीनं गुरुवारी नवा सार्वकालीन उच्चांक गाठला आहे.

सेन्सेक्स ४२००० हजार अंकांवर
SHARES

सेन्सेक्स आणि निफ्टीनं गुरुवारी नवा सार्वकालीन उच्चांक गाठला आहे. गुंतवणूकदारांनी बाजारात जोरदार खरेदी केल्यानं सकाळच्या सत्रात सेन्सेक्स १७७ अंकांनी वधारून ४२०५० अंकापर्यंत वाढला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४२ अंकांच्या वाढीसह १२३८६ अंकांवर आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारी संघर्ष मिटल्यानंतर जगभरातील शेअर बाजारात तेजी आहे.

गुरूवारी सकाळच्या सत्रात सन फार्मा, कोटक बँक, अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल, टायटन, ऍक्सिस बँक, एसबीआय, मारुती, टीसीएस हे शेअर तेजीत आहेत. मात्र, एशियन पेंट, ओएनजीसी, आयटीसी, टेक महिंद्रा, टाटा स्टील, एनटीपीसी हे शेअर घसरले आहेत.

अर्थसंकल्पाचे वेध लागलेल्या गुंतवणूकदरांनी खरेदी केल्यानं सेन्सेक्स ४२००० हजार अंकांपर्यंत वाढला आहे. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यामध्ये सामान्य करदात्याला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कर स्तर बदलणे किंवा वैयक्तिक करात कपात केली जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

चीनसोबत सुरु असलेल्या व्यापारी युद्धावर तोडगा काढण्यासाठी अमेरिकेनं पुढाकार घेतला आहे. दोन्ही देशांमधील चर्चेचा पहिला टप्पा व्हाईट हाऊसमध्ये पार पडला. मागील काही सत्रात खनिज तेलाच्या किमतीत घसरण झाली. या सर्व घडामोडी शेअर बाजारातील तेजी वाढण्यास कारणीभूत ठरल्याची माहिती समोर येत आहे.



हेही वाचा -

महाराष्ट्र पोलीसांतर्फे मुंबईत आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन

मुंबईतील किमान तापमान १५ अंशाच्या खाली



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा