Advertisement

मुंबईतील किमान तापमान १५ अंशाच्या खाली

मुंबईसह परिसरात थंडी वाढली असून, मुंबईतील पारा घसरला आहे.

मुंबईतील किमान तापमान १५ अंशाच्या खाली
SHARES

मुंबईसह परिसरात थंडी वाढली असून, मुंबईतील पारा घसरला आहे. बुधवारी सकाळी काही ठिकाणी किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या खाली नोंदविण्यात आलं. मुंबई आणि परिसराबरोबरच उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाल्याची माहिती आहे. त्याशिवाय, उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळं पुढील काही दिवसांत किमान तापमानात वाढ होणार नसल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

बुधवारी संध्याकाळी मुंबईच्या अनेक भागांत थंड वारे वाहत होते. थंडीतील चढ-उतार सुरू असताना किमान आणि कमाल तापमानात मागील आठवड्यात वाढ झाली. परंतु, बुधवारी त्यामध्ये बरीच घसरण झाली असून, किमान तापमान २० अंशावरून १६.९ अंश सेल्सिअसवर आलं. बोरिवली, पवई आणि पनवेल इथं किमान तापमान १५ अंशाच्या खाली घसरलं. कमाल तापमानात एक अंशाची घट होऊन २८.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आलं.

राज्यात सर्वात कमी किमान तापमान नांदेड आणि गोंदिया येथे ११.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.मध्य महाराष्ट्रात किमान तापमान १३ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान, तर मराठवाडा आणि विदर्भात ११ ते १७ अंशाच्या दरम्यान होतं.



हेही वाचा -

सेन्सेक्स ४२००० हजार अंकांवर

महाराष्ट्र पोलीसांतर्फे मुंबईत आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा