
राज्य सराकारने मंगळवारी मुंबई मेट्रो (mumbai metro) लाइन 8ला अखेर मंजुरी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या या मार्गिकेच्या बांधकामाला अखेर राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली आहे.
या प्रकल्पासाठी अपेक्षित खर्च 22,862.07 कोटी रुपये इतका आहे. यापैकी 40 टक्के निधी सरकारकडून दिला जाणार आहे.
राज्य (maharashtra) सरकार या प्रकल्पासाठी सिडको (CIDCO)सोबत भागीदारी करणार आहे.
डिझाइन, बांधकाम, वित्त, ऑपरेट आणि ट्रान्सफर (DBFOT) मॉडेल अंतर्गत यायी अंमलबजावणी केली जाणार आहे. सार्वजनिक व खासगी भागीदारीतून (PPP) हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
मुंबई मेट्रो 8 (mumbai metro 8) वर एकूण 20 स्थानकं असणार आहेत. यापैकी 14 स्थानकं उन्नत असून 6 स्थानकं भूमिगत असतील. या 34.9 किमी लांब मार्गिकेवर 25.09 किमी भाग उन्नत असून, 9.8 किमी भाग भूमिगत असणार आहे.
या मार्गिकेमुळे सायन-पनवेल महामार्ग, अटल सेतू आणि शिवडी ते न्हावा शेवा सागरी किनारा मार्गावरून मुंबई (mumbai) ते नवी मुंबई (navi mumbai) प्रवास करणाऱ्यांना एक उत्तम पर्याय उपलब्ध होणार आहे.
यामुळे या सर्व मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार असून, लोकल ट्रेनचे (local train) धक्के खातही प्रवास करण्याची गरज राहणार नाही आहे.
मेट्रो मार्गिका 8 चं बांधकाम जून 2026 पासूनच सुरू करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. मंडाळे येथे 27.2 हेक्टर वनजमिनीवर मेट्रोसाठी कार डेपो उभारला जाणार आहे.
या कारशेडचा उपयोग बांधकामातील कामांसाठी आणि मेट्रोच्या देखभालीसाठी केला जाणार आहे. कोणताही अडथळा आला नाही तर 2031 पर्यंत ही मेट्रो मार्गिका सुरू करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे.
हेही वाचा
