Advertisement

ईद-ए-मिलाद मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात वाहतुकीत मोठे बदल

वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग जाहीर केले आहेत

ईद-ए-मिलाद मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात वाहतुकीत मोठे बदल
SHARES

26 ऑगस्टला ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी मुम्ब्रा आणि विठ्ठलवाडी उपविभागासाठी वाहतूक निर्बंध आणि पर्यायी मार्ग जाहीर केले आहेत.

हे निर्बंध 26 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजल्यापासून मिरवणुका संपेपर्यंत लागू राहणार आहेत.

मुंब्रात अवजड वाहनांना प्रवेशबंदी

रेतीबंदर आणि Y-जंक्शन, कळसेकर कॉलेजमार्गे मुम्ब्र्यात येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

अवजड वाहनांना मुंब्रा बायपासचा वापर करून इच्छित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

याशिवाय रेतीबंदर आणि Y-जंक्शनमार्गे मुम्ब्रा शहरात येणाऱ्या सरकारी आणि खासगी बसनाही प्रवेश बंद असेल.

या मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांना संबंधित ठिकाणी उतरवून बसने परत फिरावं किंवा मुम्ब्रा बायपासमार्गे शहराला वळसा घालावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

विठ्ठलवाडी-उल्हासनगरमध्ये मार्ग टप्प्याटप्प्याने बंद

मिरवणूक पुढे सरकत असताना विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर परिसरातील वाहतूक टप्प्याटप्प्याने बंद किंवा वळवण्यात येणार आहे.

मिरवणुकीचा मार्ग:

नेहरू नगर (उल्हासनगर-5) → वसंत बहार चौक → जुना बस स्टॉप → मेन रोड → हिल लाईन पोलीस ठाण्यासमोरील रस्ता → नेताजी चौक → भाटिया चौक → कुर्ला कॅम्प रोड → समता नगर रोड → कैलास कॉलनी

या संपूर्ण मिरवणूक मार्गावर ‘नो पार्किंग’ लागू करण्यात आला आहे.

वाहनचालकांनी मुख्य मार्गावर वाहनं उभी न करता लगतचे साईड रोड आणि पर्यायी लेनमध्ये उपलब्ध अधिकृत पार्किंगचा वापर करावा.

अत्यावश्यक सेवांना निर्बंधातून सूट

पोलीस वाहनं, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका यांना या वाहतूक निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.

ठाणे, मुम्ब्रा, कल्याण आणि उल्हासनगर परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी प्रवासाचं नियोजन आधीच करावं, बायपास आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.



हेही वाचा

महाराष्ट्रातील PUC प्रमाणपत्राच्या शुल्कात बदल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा