
यामध्ये वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील (BKC) मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) क्लबमध्ये सुरू असलेल्या 5 रेस्टॉरंट्सचा समावेश आहे. FDAच्या तपासणीदरम्यान या आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा नियमांचं पालन न केल्याचं आणि काही अनियमितता आढळून आल्या.
याशिवाय मुंबईतील आणखी 4 रेस्टॉरंट्सवरही परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता, सुरक्षितता, अन्न साठवण्याची पद्धत आणि परवाना नियमांचं पालन याबाबत FDAकडून सध्या मुंबईतील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची तपासणी सुरू आहे.
अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्यास यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा FDAने दिला आहे. नियमभंग आढळल्यास परवाना निलंबित करण्यापासून ते थेट रद्द करण्यापर्यंतची कारवाई केली जाऊ शकते.
MCA क्लबमधील पाच रेस्टॉरंट्ससह एकूण 9 आस्थापनांवर झालेली ही कारवाई म्हणजे अन्न सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या रेस्टॉरंट्सना FDAचा स्पष्ट इशारा मानला जात आहे.
हेही वाचा
