Advertisement

मुंबई विद्यापीठाकडून पेपरलेस परीक्षेचं नियोजन

परीक्षा केंद्रों पर स्टायलस का उपयोग करके छात्र टेबलेट पर प्रश्नों के उत्तर दे पाएंगे।

मुंबई विद्यापीठाकडून पेपरलेस परीक्षेचं नियोजन
SHARES

परीक्षा प्रक्रिया वेगवान व सुलभ करण्याच्या प्रयत्नात मुंबई विद्यापीठानं (Mumbai University) पेपरलेस परीक्षा (Paperless exam) घेण्याचं नियोजन केलं आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर (Exam centre) स्टाईलस (Stylus) या यंत्रणेचा वापर करुन टॅबलेटवर प्रश्नांची उत्तरे देता येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरपत्रिका स्कॅन (scan) करून ती ऑनलाईन (online) मूल्यांकन प्रणालीवर अपलोड करण्याची प्रक्रिया खूप लांब आहे. त्यामुळं परीक्षा प्रक्रीया (Exam process) वेगवान व्हावी यासाठी स्टायलस वापरण्याच्या योजनेवर विचार केला जात आहे.

मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, उत्तरपत्रिका (Answer sheet) स्कॅन करण्यासाठी अधिक वेळ वाया जातो. कारण मुंबईतच २ लाखाहून जास्त विद्यार्थी (Students) आहेत. त्यामुळं प्रत्येक उत्तरपत्रिका स्कॅन करावी लागत असून, त्यानंतर या उत्तरपत्रिका पेपर तपासणीच्या सिस्टीममध्ये अपलोड करावे लागतात. यासर्व प्रक्रियेत अधिक वेळ खर्च करावा लागतो, तसंच मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात लागत.

हेही वाचा - मुंबई पोलीस घोड्यांवरून घालणार गस्त…

विद्यापीठाच्या योजनेनुसार, पेपर लेस परीक्षेसाठी (Paperless exam) विद्यार्थ्यांना टॅबलेट (Tablet) व स्टायलस दिले जाणार आहेत. तसंच, विद्यार्थ्यांसाठी एक युनिक लॉगिन आयडी (Login ID) पासवर्ड बनविण्यात येणार असून, याच्या मदतीनं विद्यार्थी आपल्या परीक्षेसाठी (Exam) उपस्थित होऊ शकतात.

या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थी प्रश्नांची (questions) थेट उत्तर देऊ शकणार आहेत. त्याचप्रमाणं, या प्रक्रियेमुळं भौतिक उत्तरपत्रिका एकत्र करण्यास, स्कॅन करण्यास आणि अपलोड करण्यास वेळ कमी लागणार आहे. ही प्रक्रिया मुंबई विद्यापीठ सुरूवातील विभागीय स्तरावर सुरू करणार आहे.

हेही वाचा - नाईटलाइफवरून शिवसेना-राष्ट्रवादीत मतभेद?

पेपरलेस परीक्षा घेण्यात येणाच्या विचारात मुंबई विद्यापीठ (Mumbai University) असलं तरी या योजनेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण याआधी मुंबई विद्यापीठाचे अनेक घोळ समोर आले आहेत. अनेकदा परीक्षा वेळेत न होणे तर काही वेळा विद्यार्थ्यांच्या निकालाला उशिरं लागणं. या सर्व गोंधळात विद्यार्थ्याना पुढील शिक्षणासाठी प्रवेश (Addmition) घेण्यासाठी अडथळे (Issues) निर्माण होतात. 

विशेष म्हणजे पेपरलेस परीक्षा (Paperless) ही ऑनलाइन (Online) असल्यानं सिस्टीम हॅंग होण्याची शक्यात नाकारता येत नाही. मात्र, तसं झाल्यास विद्यार्थ्यांचा (Students) अतिरीक्त वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. 



हेही वाचा -

एसी लोकलमध्येही आता खरेदी करता येणार

नाईटलाइफवरून शिवसेना-राष्ट्रवादीत मतभेद?



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा