Advertisement

नाईटलाइफवरून शिवसेना-राष्ट्रवादीत मतभेद?

मुंबईतील अनिवासी भागात रात्रीच्या वेळेतही हाॅटेल-रेस्टाॅरंट आणि माॅल्स सुरू ठेवण्याच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील मतभेद उघड झाले आहेत. २२ जानेवारीला होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय होऊ शकतो.

नाईटलाइफवरून शिवसेना-राष्ट्रवादीत मतभेद?
SHARES

मुंबईतील अनिवासी भागात रात्रीच्या वेळेतही हाॅटेल-रेस्टाॅरंट आणि माॅल्स (hotels and malls) सुरू ठेवण्याचा निर्णय राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Tourism minister Aaditya thackeray) यांनी शुक्रवारी जाहीर केला होता. परंतु या निर्णयामुळे मुंबई पोलिसांवर (mumbai police) अतिरिक्त ताण येऊ शकतो का? याचा आढावा घेतल्यानंतर या निर्णयाची अंमलबाजावणी करण्यात येईल, असं वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख (home minister anil deshmukh) यांनी केल्याने आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील नाईटलाइफ (nightlife)वरून महाविकास आघाडीतील (maha vikas aghadi) मतभेद समोर आले. 

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे (mumbai police commissioner sanjay barve), मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी (bmc commissioner pravin pardeshi) आणि हाॅटेल-रेस्टाॅरंट, माॅल्सच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर आदित्य यांनी मुंबईतील अनिवासी भागात २७ जानेवारीपासून हाॅटेल-रेस्टाॅरंट आणि माॅल्स (hotels and malls) २४x७ सुरू ठेवता येतील, अशी घोषणा केली. 

हेही वाचा- मुंबईतील माॅल्स, हाॅटेल २४ तास राहणार खुले, अखेर शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याने घेतला धडाकेबाज निर्णय

मुंबई २४x७ काम करू शकते, आॅनलाइन खरेदी २४ तास सुरू राहू शकते, तर रात्रीच्या वेळेस मुंबईतील दुकाने आणि व्यावसायिक जागा का सुरू राहू शकत नाहीत. जी दुकाने सकाळच्या वेळेत अधिकृत असतात, ती दुकाने रात्रीच्या वेळेस अनधिकृत ठरू शकत नाहीत. केवळ अशा ठिकाणी मद्यपान सुरू ठेवता येणार नाही, असा खुलासाही आदित्य यांनी यावेळी केला.

त्यावर भाजपा (bjp) आणि मनसेने (mns) हरकत घेत आपला विरोध नोंदवला. भाजप आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी मुंबईत नाईटलाइफच्या (Night life in mumbai) नावावर बार- लेडीज बार (ladies bar) पुन्हा एकदा सुरू होऊ शकतात, असा इशारा दिला. तर मनसे नेते संदीप देशपांडे (sandip deshpande) यांनी चला आता मुंबईतसुद्धा ‘रात्रीस खेळ चाले’ म्हणत टोमणा हाणला.

हेही वाचा- ‘ही’ १२ वादग्रस्त वक्तव्ये, ज्यामुळे शिवरायांनाही झालं असेल दु:ख

तर, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांवरील ताणाचा मुद्दा उपस्थित करत २२ जानेवारीच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा करून निर्णय घेऊ असं, सांगत हा निर्णय लांबणीवर टाकल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली. पण रात्री आदित्य यांनी फोन करून चर्चा करताच देशमुख यांनी नव्याने ट्विट करत मवाळ भूमिका घेतली. 

आदित्य यांचा हा प्रस्ताव जर अनिवासी भागापुरता मर्यादीत असेल, तर नाईटलाइफ ही संकल्पना लवकरात लवकर सुरू होऊ शकेल, असं देशमुख म्हणाले. यामुळे आदित्य यांच्या संकल्पनेतील नाइटलाईफचा विषय पुढं सरकल्याचं म्हटलं जात आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा