Advertisement

मुंबईतील माॅल्स, हाॅटेल २४ तास राहणार खुले, अखेर शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याने घेतला धडाकेबाज निर्णय

मुंबईतील नाईट लाइफसाठी आग्रही असणाऱ्या शिवसेनेने अखेर बहुप्रतिक्षीत निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मुंबईतील माॅल्स आणि हाॅटेल (malls & hotels) २४X७ सुरू राहणार आहे.

मुंबईतील माॅल्स, हाॅटेल २४ तास राहणार खुले, अखेर शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याने घेतला धडाकेबाज निर्णय
SHARES

मुंबईतील नाईट लाइफसाठी आग्रही असणाऱ्या शिवसेनेने अखेर बहुप्रतिक्षीत निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मुंबईतील माॅल्स आणि हाॅटेल (malls & hotels) २४X७ सुरू राहणार आहे. हा निर्णय २७ जानेवारीपासून लागू असणार आहे. 

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya thackeray) यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे (mumbai police commissionar sanjay barve) आणि शाॅपिंग माॅल, हाॅटेल-रेस्टाॅरंटचे प्रतिनिधी यांच्यासोबत यासंदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीनंतर मुंबई महापालिका आणि पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात येणाऱ्या अनिवासी भागातील माॅल्स आणि हाॅटेल्स आठवड्यातील सातही दिवस २४ तास खुली ठेवण्यात परवानगी देण्यात आली. या निर्णयाला महापालिका आयुक्त प्रविण परदेशी (bmc commissioner pravin pardeshi) यांनीही मंजुरी दिली आहे.

हेही वाचा- मुंबईकरांचा दररोज दीड तास वाहतूककोंडीत वाया!

या आधीही आदित्य ठाकरे यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील दुकाने रात्रभर सुरू ठेवण्यात यावी, अशी मागणी केली होती. जे व्यवसाय दिवसा वैध असतात, ते रात्री अवैध ठरू शकत नाहीत. या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारच्या महसूलात भर पडेल आणि रोजगारातही भर पडेल, असं आदित्य म्हणाले होते.

या निर्णयामुळे मुंबईतील २५ माॅल्स रात्रभर उघडी राहणार आहेत. मात्र यासंदर्भातील निर्णय संबंधीत माॅल-हाॅटेल चालकांनाच घ्यायचा आहे. हे माॅल-हाॅटेल (malls & hotels) सुरू ठेवताना तिथं सीसीटीव्ही कॅमेरा, पार्किंगची व्यवस्था चोख ठेवावा लागेल तसंच आवाजाचं प्रदूषण होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागणार आहे.

सध्या तरी माॅल्स आणि हाॅटेल चालक आठवडाभराऐवजी शनिवार-रविवारी हाॅटेल, माॅल्स उघडे ठेवण्याच्या तयारीत असल्याचं समजत आहे.   

हेही वाचा- रुग्णालयापेक्षा पुतळ्याच्या उंची महत्वाची, मुंबई उच्चन्यायालयाने सरकारला फटकारले

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा