Advertisement

मुंबई पोलीस घोड्यांवरून घालणार गस्त…

पुढच्या काही दिवसांत मुंबई पोलीस दलात तब्बल ८८ वर्षांनंतर पुन्हा एकदा अश्वदल (mounted police unit) सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या गृहविभागाने घेतला आहे.

मुंबई पोलीस घोड्यांवरून घालणार गस्त…
SHARES

पुढच्या काही दिवसांत मुंबई पोलीस (Mumbai police) वाहनांऐवजी घोड्यावरून गस्त घालताना दिसल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका, यामागचं कारण म्हणजे मुंबई पोलीस दलात तब्बल ८८ वर्षांनंतर पुन्हा एकदा अश्वदल (mounted police unit) सुरू करण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे. शिवाजी पार्क इथं २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताकदिन कार्यक्रमात हे अश्वपथक सहभागी होणार असून त्यानंतर कायदा-सुव्यवस्था राखण्यातही हे दल कार्यरत राहील. 

या संदर्भात माहिती देताना गृहमंत्री अनिल देशमुख (home minister anil deshmukh) म्हणाले की, मुंबई महानगरात वाहनांची संख्या वाढल्यानंतर अश्वदलाला पोलीस विभागातून हटवण्यात आलं होतं. सद्यस्थितीत मुंबई पोलीस दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या माध्यमातून कायदा- सुव्यवस्था राखण्याचं काम करतात. पण पोलीस घोडेस्वार असल्यास त्यांना उंचीवरून जमावावर लक्ष ठेवणं सोपं होणार आहे. तसंच वाहतुकीची कोंडी फोडणे आणि समुद्रकिनाऱ्यावर गस्त घालण्यासाठीही अश्वदल उपयुक्त ठरू शकेल.  

हेही वाचा- नाईटलाइफवरून शिवसेना-राष्ट्रवादीत मतभेद?

अश्वदलासाठी मुंबई पोलिसांनी १३ घोडे खरेदी केले असून पुढील ६ महिन्यांत आणखी घोडे खरेदी करण्यात येणार आहेत. या घोड्यांची व्यवस्था सद्यस्थितीत शिवाजी पार्क (shivaji park) इथं करण्यात आली आहे. परंतु लवकरच त्यांच्यासाठी मरोळ इथं २.५ एकर जागेवर पागा तयार करण्यात येईल, अशी माहितीही देशमुख यांनी दिली.

अश्वलदाची वैशिष्ट्ये:

  • मुंबई पोलिसांच्या अश्वदलात ३० घोडे असतील
  • सोबत १ सब इन्स्पेक्टर, १ एएसआय, ४ हेडकाॅन्स्टेबल आणि ३२ काॅन्स्टेबल असतील
  • घोडेस्वारांना वाॅकीटाॅकी, माऊंटेड कॅमेरा देण्यात येईल
  • मुंबई पोलिसांच्या अश्वदलाकडून लाठीमार केला जाणार नाही
  • जमाव पांगवण्यास घोडेस्वारांची होणार मदत
  • गस्तीच्या ठिकाणी वाहनांतून घोड्याची ने-आण करणार

ब्रिटीश काळातील मुंबई पोलीस दलात अश्वदल कार्यरत होतं. परंतु १९३२ साली अश्वदल बंद करण्याचा निर्णय ब्रिटीश सरकारने (british india) घेतला होता. मुंबईत वाढत असलेली वाहनांची गर्दी त्याला कारणीभूत होती. त्यानंतर तब्बल ८८ वर्षांनी हे दल पुन्हा कार्यरत होणार आहे. यामुळे मुंबई पोलीस दलाच्या वैशिष्ट्यांमध्ये आणखी भर पडणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

हेही वाचा- मुंबईत नशेसाठी कप सीरप घेणाऱ्यांमध्ये वाढ

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा