मुंबईतील तापमानात (Temperature) घट झाल्यानं गारठा (Cold) प्रचंड वाढला आहे. या तापमानामुळं मुंबईकरांना साथीच्या आजारांचा सामना करावा लागतो आहे. यामध्ये मुख्यत: सर्दी व खोकल्याच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळं केमिस्टजवळील कफ सीरप (cuff syrups) घेणाऱ्यांमध्येही मोठी वाढ झाली आहे. मात्र, काही जण या कप सीरपचा नशेसाठी (Intoxication) वापर करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कफ
सीरपचा नशेसाठी अधिक वापर
होत असल्यानं त्यांच्या
विक्रीत (Selling)
वाढ
झाली आहे.
कफ
सीरपच्या बेकायदा विक्रीप्रकरणी
(Illegal
sale)
ठोस
कारवाईची गरज असताना अन्न व
औशध प्रशासनाकडून (एफडीए)
मात्र
गेल्या वर्षभरात नगण्य कारवाई
करण्यात आली आहे.
दुसरीकडं,
मुंबई
पोलिसांनी (Mumbai
Police)
वर्षभरात
सुमारे ७ हजार कफ सीरपच्या
बाटल्या (cuff syrups Bottle)
जप्त
केल्या आहेत.
मुंबईमध्ये
स्थानिक पोलिस ठाणी,
तसेच
अंमली पदार्थविरोधी पथकांनी
असे पदार्थ पुरविणाऱ्यांविरोधात
कंबर कसल्यानं ते सहज मिळणं
कठीण झालं आहे.
यामुळं
नशेबाजांनी प्रतिबंधित औषधांचा
डोस घेण्याकडे आपला मोर्चा
वळविला आहे.
केमिस्टमध्ये
(Medical)
कप
सिरप हे प्रिस्क्रिप्शनशिवाय
सर्वाधिक विक्री होणारे औषध
आहे.
नशेसाठी
कफ सीरपची विक्री करणाऱ्यांवर
पोलिस आणि एफडीएकडून (FDA)
कारवाई
करण्यात येते.
मुंबई
पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी
पथकानं (Anti
narcotic cell)
या
प्रकरणी सन २०१९मध्ये ७ हजार
कफ सीरपच्या बाटल्या हस्तगत
केल्या.
तसंच,
११
जणांना अटक केली.
सन
२०२०च्या सुरुवातीला 'ऑपरेशन
कमळी'
हाती
घेतल्यानं ड्रग्ज सहजासहजी
मिळणं मुश्कील झाल्यानं कफ
सीरपचा वापर वाढला.
मुंबईत
नशेसाठी कफ सीरप पुरविणाऱ्या
अमृतलाल उर्फ अमित राठोड या
बड्या विक्रेत्याला अंमली
पदार्थविरोधी पथकाचे पोलिस
निरीक्षक प्रवीण कदम यांच्या
पथकानं अटक केली.
त्याच्याकडे
तब्बल साडेसहा लाखांच्या
१६३८ कफ सीरपच्या बाटल्या
सापडल्या.
कफ
सीरप हे औषध म्हणून घेतल्यास
त्याचे प्रमाण ठराविक असते,
परंतु,
नशेसाठी
२०० मिलीची बाटली तरुण पितात.
हे
सीरप तत्काळ परिणाम दाखवतं.
ड्रग्जप्रमाणे
उत्तेजित करते आणि नंतर शरीर
सुस्त करतं.
सीरप
अधिक प्रमाणात घेतल्यास ही
धुंदी झोप आणते.
त्यामुळे
आपल्या घरातील तरुण-तरुणी
वारंवार कफ सीरप घेत असल्यास
वेळीच सावध व्हा,
असं
आवाहन पोलिसांच्या वतीनं
करण्यात आलं आहे.
हेही वाचा -
चित्रकला परीक्षांच्या विद्यार्थ्यांना मिळणार वाढीव गुण
अखेर 'त्या' रुग्णांसाठी धावली महापालिका