चित्रकला परीक्षांच्या विद्यार्थ्यांना मिळणार वाढीव गुण

एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट परीक्षेत उतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं (State Government) घेतला आहे.

SHARE

एलिमेंटरी (Elementary) किंवा इंटरमिजिएट (Elementary) या चित्रकलेच्या परीक्षा (Exam) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (Students) आनंदाची बातमी आहे. कारण आता एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट परीक्षेत उतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं (State Government) घेतला आहे. इंटरमिजिएट परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत काही वर्षांपासून वाढ होत आहे. त्याशिवाय, या परीक्षेचा विद्यार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी त्यांना वाढीव गुण (Extra Marks) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चित्रकला परीक्षेत विद्यार्थ्यांना वाढीव गुण मिळावेत यासाठी शाळांना (School) प्रस्ताव सादर करण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं (State Board of Secondary and Higher Secondary Education) २५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळं विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे. इंटरमिजिएट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव दरवर्षी शाळांना १५ जानेवारीपर्यंत बोर्डाकडे पाठवायचे होते. मात्र, सप्टेंबरमध्ये अपेक्षित असलेली ही परीक्षा नोव्हेंबर २०१९ मध्ये घेण्यात आली.

परीक्षेला उशिर झाल्यानं निकालालाही (Results) विलंब होणार असल्यानं विद्यार्थ्यांचे प्रस्ताव १५ जानेवारीपर्यंत बोर्डाकडे पाठवणं शाळांना शक्य नव्हतं. त्यामुळं विद्यार्थी सवलतीच्या गुणांपासून वंचित होण्याची शक्यता निर्माण झाली असून, यामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये व त्यांना परीक्षेचे गुण मिळावेत यासाठीही प्रस्ताव पाठवण्याची मुदत वाढवण्याची मागणी मुख्याध्यापक संघटनांकडून करण्यात आली होती.

याची दखल घेत बोर्डानं प्रस्ताव पाठवण्याची मुदत २५ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार शास्त्रीय कला, चित्रकला व लोककलेच्या सवलतीच्या गुणांचे प्रस्ताव विद्यार्थ्यांनी शाळेकडं १५ फेब्रुवारीपर्यंत सादर करायचे आहेत. त्यानंतर शाळांनी विभागीय मंडळाकडं २५ फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करायचे आहेत.हेही वाचा -

मुंबई मॅरेथॉन २०२०: ज्येष्ठ धावपटूचा हृदयविकारानं मृत्यू

अखेर 'त्या' रुग्णांसाठी धावली महापालिकासंबंधित विषय
ताज्या बातम्या