Advertisement

अखेर 'त्या' रुग्णांसाठी धावली महापालिका

गरजू रुग्णांच्या मदतीसाठी महापालिकेकडून स्थानिक सामाजिक संस्था (Local Social Organisation), धर्मशाळांच्या (Dharamshala) माध्यमातून राहण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

अखेर 'त्या' रुग्णांसाठी धावली महापालिका
SHARES

मुंबईतील परळ (Parel) येथील प्रसिद्ध टाटा कॅन्सर रुग्णालयात (Tata Cancer Hospital) देशभरातून अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात. स्वस्त व परवडणाऱ्या दरात उपचार होत असल्यानं या रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या रुग्णालयात केमोथेरपीसाठी (Chemotherapy) येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. परंतु, रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना मुंबईत राहणं परवडत नसल्यानं अनेक जण हिंदमाता पुलाखाली (Hindmata Bridge) अथवा रुग्णालयाशेजारील मैदानात आपला आसरा शोधत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक रुग्ण या ठिकाणी राहत आहेत. परंतु, या रुग्णांच्या मदतीसाठी महापालिकेनं (BMC) पुढाकार घेतला आहे.

या गरजू रुग्णांच्या मदतीसाठी महापालिकेकडून स्थानिक सामाजिक संस्था (Local Social Organisation), धर्मशाळांच्या (Dharamshala) माध्यमातून राहण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. तसंच, बेस्टच्या (BEST) जुन्या बसेसचं (BUS) स्वरूप बदलून रुग्णांना राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसंच, दादर पश्चिम येथील जाखादेवी मंदिराजवळील (Jakhadevi Temple) प्रसूतिगृहाच्या (Maternity hospital) रिकाम्या भूखंडावर अद्ययावत धर्मशाळा उभारण्याच्या विचारात महापालिका (BMC) असल्याची माहिती समोर येत आहे.

टाटा कॅन्सर रुग्णालयात वर्षांकाठी ८५ हजार नवीन रुग्ण उपचारासाठी येत असतात. तर नियमित तपासणी आणि उपचारासाठी साडेपाच लाख रुग्ण येत असतात. मात्र, मुंबईत राहण्याची सोय नसलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक रुग्णालयाजवळ असलेल्या मैदानात किंवा हिंदमाता पुलाच्या खाली मिळेल तेथे पथारी पसरून राहतात. मात्र, या रुग्णांच्या व्यवस्थेसाठी येत्या २ दिवसांत टाटा रुग्णालयातील रुग्णांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांची बैठक घेऊन रुग्ण (patients) आणि नातेवाईकांच्या (Relatives) निवासाची उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती मिळते.

टाटा कॅन्सर रुग्णालयानं परळ येथील हाफकिन संस्थेत रुग्ण व नातेवाईकांसाठी धर्मशाळा उभारण्याचं काम हाती घेतले आहे. संत गाडगेबाबा संस्थेच्या ७ मजली इमारतीत ५०० हून जास्त रुग्ण व नातेवाईकांची व्यवस्था केली जाते. या ठिकाणी रुग्णांकडून केवळ ५० रुपये प्रतिदिन राहण्यासाठी आकारण्यात येतात. त्यात सकाळचा नाश्ता, दुपार व रात्रीचं भोजन विनामूल्य दिलं जातं आहे.



हेही वाचा -

चित्रकला परीक्षांच्या विद्यार्थ्यांना मिळणार वाढीव गुण

मुंबईमध्ये दीड वर्षांत ८१ हजार किलो प्लास्टिक जमा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा