Advertisement

मुंबई मॅरेथॉन २०२०: ज्येष्ठ धावपटूचा हृदयविकारानं मृत्यू

मुंबई मॅरेथॉन २०२० या स्पर्धेला यंदा धावपटूच्या मृत्यूचे (Dead) गालबोट लागले.

मुंबई मॅरेथॉन २०२०: ज्येष्ठ धावपटूचा हृदयविकारानं मृत्यू
SHARES

मागील १६ वर्षांपासून 'मुंबई मॅरेथॉन २०२०'चं (mumbai marathon 2020) आयोजन करण्यात येत आहे. यंदाही या मॅरोथॉनचं (marathon) आयोजन करण्यात आलं होतं. रविवारी जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केलेली आणि गोल्ड लेबल (Gold Label) दर्जा प्राप्त केलेली मुंबई मॅरेथॉन उत्साहात पार पडली. आपलं सामाजिक म्हणणं अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यंदाही अनेकांनी मॅरेथॉन व्यासपीठाचा उपयोग करून घेतला. यंदा या मॅरेथॉनचं १७ वं वर्ष असून, मुख्य स्पर्धा, हाफ मॅरेथॉन, जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग बांधवांसाठी खास मॅरेथॉन व ड्रीमरन अशा विविध विभागांत तब्बल ५५ हजाराहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. परंतु, या स्पर्धेला यंदा धावपटूच्या मृत्यूचे (Dead) गालबोट लागले.

या मॅरोथॉनमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या गटात धावणाऱ्या गजेंद्र मांजळकर (६४) यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं (Heart attack) मृत्यू झाल्याची घटना घडली. त्याशिवाय साडेतेराशे धावपटू जखमी (Injured) झाले असून, १७ जणांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्याची वेळ आल्याची माहिती समोर येत आहे. मांजळकर हे ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते.

मॅरेथॉनमध्ये धावत असताना गरवारे चौकाजवळ (Garware Chowk) त्यांना हृदयविकाराचा झटका आला. रुग्णवाहिकेतून वैद्यकीय मदत केंद्रावर आणून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना बॉम्बे रुग्णालयात (Bombay Hospital) दाखल करण्यात आले. त्यावेळी उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मॅरेथॉनदरम्यान छातीत धडधड होणं, छातीत दुखणं, अस्थिभंग (फ्रॅक्चर), जबड्याला दुखापत, स्नायू आखडणं यांमुळे एकूण १७ धावपटूंना बॉम्बे, लीलावती, जीटी, हिंदुजा या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं. त्यापैकी १४ जणांना उपचारांनतर घरी सोडण्यात आल्याची माहिती मिळते.

अर्ध मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या ५१ वर्षीय धावपटूला मेंदुघाताचा (ब्रेन स्ट्रोक) त्रास झाला, तर ४१ वर्षीय धावपटूला हृदयविकाराचा झटका आला. या दोघांवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या स्पर्धेदरम्यान १९ धावपटूंना शरीरातील पाणी कमी झाल्यानं त्रास झाला. त्यांच्यावरही वैद्यकीय मदत केंद्रात उपचार करण्यात आले. त्याचप्रमाणं १३५० धावपटू किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळते.



हेही वाचा -

‘या’ नेत्यांच्या वक्तव्यांमुळे शिवरायांनाही झालं असेल दु:ख

रेल्वे रुळावरील पाणी उपसणार अग्निशमन दल



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा