रेल्वे रुळावरील पाणी उपसणार अग्निशमन दल

रेल्वे रुळावर पाणी तुंबल्यास पाणी उपसून बाहेर फेकणारे आधुनिक वाहन मुंबई अग्निशमन दलात दाखल होत आहे.

SHARE

पावसाळ्यात (rain) मुंबईत जास्तीचा पाऊस (Heavy Rain) पडल्यास मुंबईची तुंबई होते. त्यामुळं मुंबईच्या रस्त्यासंह रेल्वे रुळही (Railway Track) पाण्याखाली जातात. रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्यानं वाहतूक विस्कळीत होऊन प्रवाशांना मोठ्या समस्येला (Issues) सामोरं जावं लागतं. त्यामुळं प्रवाशांच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अग्निशमन दलाचे (Fire brigade) जवान मदतीला धावून येणार आहेत.

रेल्वे रूळ (Railway Track) आणि सखल भागांमध्ये पाणी तुंबल्यास पाणी उपसून बाहेर फेकणारे आधुनिक वाहन मुंबई अग्निशमन दलात दाखल होत आहे. ४ हजार ते २० हजार लीटर पाणी उपसून काढण्याची क्षमता या वाहनामध्ये आहे. गतवर्षी पावसाळ्यात रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्यानं मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस (Mumbai Kolhapur Mahalaxmi Express) अडकली होती.

या एक्स्प्रेसमधील तब्बल ९०० प्रवाशांना १७ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकानं (National Disaster Response Team) बोट (Boats) आणि हेलिकॉप्टरच्या (Helicopters) मदतीनं सुखरूप बाहेर काढलं. अशा घटना भविष्यात पुन्हा घडू नये यासाठी हे आधुनिक वाहन अग्निशमन दलाच्या (Fire brigade) ताफ्यात दाखल होत आहे.

पूर्व, पश्चिम उपनगर आणि शहर विभागासाठी प्रत्येकी एक अशी ३ वाहनं आॅगस्टपर्यंत अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. मानखुर्द (Mankhurd), बोरीवली (Borivali) आणि भायखळा (Beykhla) येथील केंद्रांत हे वाहन ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक वाहनाची किंमत ७ कोटी रुपये आहे. यामध्ये पुरवठा, २ वर्षांची हमी आणि ५ वर्षे देखभाल कालावधीचा समावेश आहे.

पाणी तुंबलेल्या भागात पाच इंचांपर्यंत या वाहनातील पंप खाली जाऊ शकतो. आगीच्या दुर्घटनेत हे वाहन वापरले जाणार आहे. समुद्रकिनाऱ्याजवळ एखाद्या परिसरात आग लागण्याची घटना घडल्यास या वाहनाच्या मदतीने प्रति मिनिट दीड हजार लीटर पाणी खेचणं शक्य होणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या