मुंबईत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र शौचालये

तृतीयपंथीयांसाठी (transgender) शौचालये व मुताऱ्या (Toilate) बांधण्याचा विचार असल्याचं महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

SHARE

मुंबईतील तृतीयपंथीयांसा ( transgender) शौचालये व मुताऱ्या (Toilet) बांधण्याचा विचार असल्याचं महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. महापालिकेकडून 'राइट टू पी'च्या (Right to pee) रेट्यानंतर महिलांसाठी स्वतंत्र शौचालये व मुताऱ्या बांधण्यास सुरुवात करण्यात आली असून, दिव्यांगांसाठीही व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, आता तृतीयपंथीयांसाठी ( transgender) स्वतंत्र शौचालये व मुताऱ्या बांधल्यास हजारो तृतीयपंथीयांना दिलासा मिळणार आहे.

मुंबईतील तृतीयपंथीयांसाठी शौचालये व मुताऱ्या नसल्यानं त्यांची मोठी गैरसोय होते, असा मुद्दा उपस्थित करत भाजपच्या नगरसेविका (BJP corporator) दक्षा पटेल (Daksha Patel) यांनी महापालिकेनं बांधलेल्या सार्वजनिक शौचालयांमध्ये (Public Toilet) तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र व्यवस्था ठेवण्यात यावी, अशी मागणी केली होती.

मुंबईत पुरुषांसाठी शौचालये व मुताऱ्या आहेत. मात्र, महिलांसाठी ही व्यवस्था खूपच कमी असल्यानं नोकरदार आणि विविध कामांसाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांना त्यामुळं अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. महिलांचा हा प्रश्न घेऊन मागील काही वर्षांत 'राइट टू पी' चळवळीनं जोर धरला. महापालिका व सरकारशी संघर्ष करून महिलांच्या शौचालय व मुताऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ करून घेतली आहे.

भाजपच्या नगरसेविका दक्षा पटेल यांच्या या सूचनेस महापालिकेनं सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महापालिकेच्या वतीनं विविध स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयानं गर्दीच्या ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी सार्वजनिक शौचालयांची उभारणी केली जाते. या सर्व शौचालयांचं व्यवस्थापन संबंधित संस्थांच्या माध्यमातून करण्यात येतं.

या शौचालयांमध्ये आत्तापर्यंत पुरुष आणि महिलांसाठी शौचकुपांची तसंच, मुतारींची व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या काळात तृतीयपंथीयांनाही ही सुविधा देण्यासंबंधी विचार करण्यात येणार असल्याचं घनकचरा व्यवस्थापनाच्या (Solid Waste Management) प्रमुख अभियंत्यांनी लेखी अभिप्रायात स्पष्ट केलं आहे.

तृतीयपंथीयांसाठी शौचालये बांधण्यात यावी जावीत, यासाठी तत्कालीन आयुक्त अजोय मेहता (Commissioner Ajoy mehta) यांनी सन २०१६मध्ये परिपत्रक प्रसिद्ध केलं होतं. त्यानुसार महापालिकेच्या झोपडपट्टी स्वच्छता कार्यक्रमांतर्गत स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं गोवंडीत बांधलेल्या एका शौचालयात एक शौचकूप तृतीयपंथीयांसाठी देण्यात आले. मात्र, त्याची स्थिती म्हणावी इतकी चांगली नाही.

स्वच्छतेअभावी त्या शौचालयाची दुरवस्था झाली आहे, अशी माहिती 'राइट टू पी'कडून देण्यात आली आहे. तृतीयपंथीय आणि इतर असा भेदभाव होऊ नये यासाठी तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र शौचालयं न बांधता असलेल्या शौचालयांमध्ये त्यांचा समावेश करावा. तसेच, मोठ्या प्रमाणात सार्वजनिक शौचालयांमध्ये तृतीयपंथीयांसाठी शौचकुपं, मुताऱ्या ठेवायला हव्यात, अशी मागणी 'राइट टू पी'च्या कार्यकर्त्या सुप्रिया जाण यांनी केली आहे.हेही वाचा -

चित्रकला परीक्षांच्या विद्यार्थ्यांना मिळणार वाढीव गुण

मुंबईमध्ये दीड वर्षांत ८१ हजार किलो प्लास्टिक जमासंबंधित विषय
ताज्या बातम्या