पोलिसांसाठी खुशखबर, प्रत्येक जिल्ह्यात उभारली जाणार नेमबाज प्रशिक्षण केंद्र

पोलिसांच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. देशातील प्रत्येक पोलिसाला अचूक वेध साधता आला पाहिजे.

पोलिसांसाठी खुशखबर, प्रत्येक जिल्ह्यात उभारली जाणार  नेमबाज प्रशिक्षण केंद्र
SHARES

महाराष्ट्र पोलिस (Maharashtra police) दलातील कर्मचाऱ्यांना उत्तम स्वस्थ आणि त्यांच्यातील कला गुणांना वाव देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. अनेकदा अपुऱ्या सेवेमुळे पोलिसांच्या कामात अडचणी येतात. त्यामुळेच टप्या टप्याने का होईना, पोलिसांचे मनोबल उंचवण्यासाठी त्यांना योग्य तितकी मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री (Chif ministe) उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी केले. त्याच बरोबर प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांसाठी नेमबाज प्रशिक्षण केंद्र (Shooter Training Center) उभारण्याची घोषणा त्यांनी केली.

पोलिसांच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. देशातील प्रत्येक पोलिसाला अचूक वेध साधता आला पाहिजे. पोलीस सामजिक स्वास्थ राखण्याचे काम करतात. त्यामुळे पोलिसांचे स्वास्थ्य राखणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यामुळेच प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांसाठी नेमबाजी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असल्याचे ठाकरे म्हणाले. पोलिसांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी शासन कटिबद्ध. पोलीस विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. 

हेही वाचाः- सिडको पोलिसांसाठी बांधणार घर- एकनाथ शिंदे यांच्या सूचना

पोलिसांना कर्तव्याच्या ठिकाणी येताना-जाताना किमान तीन-चार तासांचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांना हक्काचे घर आवश्यक आहे. सिडको (Cidco)तर्फे नवीमुंबईत घरांचे प्रकल्प (housing Project) उभारले जात आहेत.  पोलिसांना हक्काच्या घरे मिळावीत. यासाठी सिडकोला त्यांच्या प्रकल्पात पोलिसांसाठी विशेष तरतूद करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री (Minister for Urban Development) एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.  शहरात छोटेसे का होईना हक्काचे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र घरांच्या किंमती गगनाला भिडल्याने शहरात घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. तीच गत पोलिसांचीही असून पोलिस वसाहती असल्या तरी सेवानिवृत्तानंतर कुठे जायचे, हा प्रश्न प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याला भेडसावतो.

हेही वाचाः- मुंबईत नशेसाठी कप सीरप घेणाऱ्यांमध्ये वाढ

ठिकठिकाणी पोलिस वसाहती आहेत. मात्र पोलिस वसाहतींची अवस्था बिकट झाल्याचे सर्वच ठिकाणचे चित्र आहे. शिवाय घरांची मागणी आणि उपलब्ध घरे यांच्यात बरीच तफावत असते. तर निवृत्तीनंतर प्रत्येक पोलिसाला शासकिय घर सोडावे लागते. त्यामुळेच पोलिसांना हक्काचे घर मिळावे. यासाठी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. हक्काचे घर आणि सोई सुविधांसाठी सरकारकडून लक्ष देऊन प्रयत्न सुरू असल्यामुळे पोलिस दलात आनंदाचे वातावरण आहे. 



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा