Advertisement

महाराष्ट्र पोलिसांच्या पठ्ठ्यानं अमेरिकेत जिंकलं बॉडीबिल्डींगचं सिल्व्हर मेडल


महाराष्ट्र पोलिसांच्या पठ्ठ्यानं अमेरिकेत जिंकलं बॉडीबिल्डींगचं सिल्व्हर मेडल
SHARES

बहुतांश भारतीय बॉडीबिल्डर अमेरिकन बॉडीबिल्डरचे फोटो लाऊन जीममध्ये व्यायाम करताना दिसतात. पण महाराष्ट्र पोलिसांत असा एक कॉन्स्टेबल आहे ज्यानं अमेरिकेतल्या बॉडीबिल्डींग स्पर्धेत सिल्व्हर मेडल पटकावून केवळ महाराष्ट्र पोलीसच नव्हे, तर तमाम भारतीयांना अभिमान वाटावा, अशी कामगिरी केली आहे. किशोर डांगे असं या बॉडीबिल्डरचं नाव आहे.



जालन्यात कॉन्स्टेबल

अमेरिकेतल्या लॉस एंजेलिसमध्ये 'पोलीस अँड फायर गेम्स'चं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत किशोरनं सिल्व्हर मेडल मिळवून मोठ्या अभिमानानं भारताचा झेंडा व्यासपीठावर झळकावला. या बॉडीबिल्डींग कॉम्पिटीशनमध्ये ७७ देशांचे बॉडीबिल्डर आले होते. त्यात किशोरने दुसरं स्थान मिळवलं हे विशेष. महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यात किशोर पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे.



२०१३ मध्ये गोल्ड मेडल

यापूर्वी २०११ मध्ये झालेल्या याच स्पर्धेत किशोर चौथ्या स्थानी आले होते. मात्र खडतर मेहनतीवर विश्वास असलेल्या किशोर यांनी हार मानली नाही. या कॉम्पिटीशनमध्ये यशस्वी व्हायचंच हे आव्हान स्वीकारुन त्यांनी २०१३ मध्ये या स्पर्धेत गोल्ड मेडलवर कब्जा केला.



आर्थिक चणचणीवर मात

क्रिकेटला धर्म मानणाऱ्या आपल्या देशात इतर खेळांकडं नेहमीच दुर्लक्ष होतं. त्यामुळंच इतकी अचाट कामगिरी करूनही किशोर यांना आर्थिक सहाय्य करणारा खमका प्रायोजक लाभला नाही. आर्थिक चणचणीमुळं त्यांना २०१५ मध्ये या स्पर्धेत भाग घेता आला नव्हता. पण जिद्दीने पै पै जमवत, मेहनत करत त्यांनी २०१७ मध्ये सिल्व्हर मेडल मिळवत सर्वांनाच तोंडात बोटं घालायला भाग पाडलं.



हे देखील वाचा -

यांचं वय ऐकाल तर धक्काच बसेल!

व्यायामाला वय नसतं !



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा