Advertisement

यांचं वय ऐकाल तर धक्काच बसेल!


यांचं वय ऐकाल तर धक्काच बसेल!
SHARES

खरेच व्यायामाला वय नसते, हे सिद्ध केले आहे महालक्ष्मीला राहणाऱ्या निशरीन पारीख यांनी. तरूणांनाही लाजवेल असा त्यांचा जोश, उत्साह. मी त्यांच्याविषयी आणखी काही सांगण्याआधी एकदा तरी हा व्हीडिओ बघाच!

त्यांच्या दिसण्यावर जाऊ नका. तुम्हाला त्यांच्या वयाचा साधा अंदाज देखील नसेल. बॉडी बिल्डींगमध्ये अव्वल असणाऱ्या निशरीन पारीख या ५१ वर्षांच्या आहेत!


निशरीन पारीख या महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डींग स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. ही स्पर्धा साऊथ कोरियात होणार आहे. सध्या निशरीन यासाठी खूप मेहनत घेत आहेत. फक्त स्पर्धांमध्ये जिंकणे हेच आपले स्वप्न नसून दुसऱ्यांनी माझ्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे सांगायलाही त्या विसरत नाहीत.  


मी बॉडी बिल्डर नाही, तर बिकनी अॅथलेट आहे. मी स्टेजवर जाते आणि बिकनीमध्ये पोजेस देते. या स्पर्धांमध्ये तुमची बॉडी, तुमचे प्रदर्शन, प्रतिभा आणि चेहऱ्यावरचे हावभाव या सर्वांचे परीक्षण होते. गेल्या वर्षी झालेल्या 'मसल मेनिया' या स्पर्धेत मला परिक्षक म्हणून बोलावले होते. मी ५१ वर्षांची असून स्टेजवर बिनधास्त बिकनी घालून जाते, हे सांगायला मला खूप अभिमान वाटतो. माझ्या वयाच्या लोकांना मी नेहमी जिममध्ये जाऊन व्यायाम आणि योगा करण्यासाठी प्रेरित करत असते.

निशरीन पारीख, बॉडी बिल्डर

निशरीन फक्त बॉडी बिल्डींगच नाही, तर कराटे आणि योगा देखील शिकवतात. प्रशिक्षक हा खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे, प्रशिक्षकावर तुमचा विश्वास असला पाहिजे, असेही त्या सांगतात. गेल्या तीन वर्षांपासून निशरीन तौसिफ काजी यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहेत


तीन वर्षांपूर्वी निशरीन यांचे वजन ५६ किलो होते. पण, तीन वर्षांच्या मेहनतीनंतर आता त्यांचे वय ४६ किलो आहे. निशरीन यांच्यानुसार तुम्ही काय खाता हे खूप महत्त्वाचे आहे. नैसर्गिक अन्न खाण्यावर जास्त भर देणे आवश्यक असल्याचे निशरीन यांनी सांगितले. निशरीन यांनी यावर्षी मार्चमध्ये झालेल्या 'ग्लॅडड्रॅग्स मिसेस इंडिया' या स्पर्धेत देखील सहभाग घेतला होता.

निशरीन पती हितेश आणि दोन मुलं आर्या आणि करण यांच्यासोबत राहतात. निशरीन आणि हितेश हे दोघे कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट आहेत. तर, दोन्ही मुलेही तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट आहेत

निशरीन खूप मेहनती आहे. ती माझ्या कुटुंबाला खूप चांगल्या पद्धतीने सांभाळते. तिच्या आवडी निवडी आणि कुटुंबाला ती चांगल्या प्रकारे संतुलित करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझी आई तिच्याकडून योगा शिकते. त्यामुळे तिच्या कामात ती अव्वल आहे!

हितेश पारीखनिशरीन यांचे पती

आपल्याला खरेच निशरीन यांच्यापासून प्रेरणा घ्यायला हवी. आपण फक्त ठरवतो की, व्यायाम करायचा, जिम लावायची, संतुलित आहार घ्यायचा. पण प्रत्यक्षात काही कृती करत नाही. व्यायाम न करण्याची अनेक कारणे आपण देत असतो. पण जर निशरीन पारीख करू शकतात, तर आपण का नाही? यावर नक्कीच विचार करायला हवा. वेळ अजूनही गेलेली नाही.हेही वाचा

व्यायामाच्या या टिप्स लक्षात ठेवा..नाहीतर व्यायाम जिवावर बेतू शकतो!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा