सिडको पोलिसांसाठी बांधणार घर- एकनाथ शिंदे यांच्या सूचना

पोलिसांना कर्तव्याच्या ठिकाणी येताना-जाताना किमान तीन-चार तासांचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांना हक्काचे घर आवश्यक आहे.

सिडको पोलिसांसाठी बांधणार घर- एकनाथ शिंदे यांच्या सूचना
SHARES

सर्व सामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून करून देणाऱ्या सिडकोने, राज्याच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांसाठी गृहप्रकल्प उभारण्याचे निर्देश नगरविकास मंत्रींनी एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. शिंदे यांनी नागपूर महानगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि सिडकोच्या कामाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

शहरात छोटेसे का होईना हक्काचे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र घरांच्या किंमती गगनाला भिडल्याने शहरात घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. तीच गत पोलिसांचीही असून पोलिस वसाहती असल्या तरी सेवानिवृत्तानंतर कुठे जायचे, हा प्रश्न प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याला भेडसावतो. ठिकठिकाणी पोलिस वसाहती आहेत. मात्र पोलिस वसाहतींची अवस्था बिकट झाल्याचे सर्वच ठिकाणचे चित्र आहे. शिवाय घरांची मागणी आणि उपलब्ध घरे यांच्यात बरीच तफावत असते. तर निवृत्तीनंतर प्रत्येक पोलिसाला शासकिय घर सोडावे लागते. त्यामुळेच पोलिसांना हक्काचे घर मिळावे. यासाठी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचाः- मुंबईकरांचा दररोज दीड तास वाहतूककोंडीत वाया!

पोलिसांना कर्तव्याच्या ठिकाणी येताना-जाताना किमान तीन-चार तासांचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांना हक्काचे घर आवश्यक आहे. सिडकोतर्फे नवीमुंबईत घरांचे प्रकल्प उभारले जात आहेत. त्यात पोलिसांसाठी ही विशेष तरतूद व्हावी. अशा सूचना शिंदे यांनी दिल्या आहेत.

संबंधित विषय