Advertisement

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा

आंदोलनातील जितेंद्र आव्हाड यांच्या सहभागावर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा
SHARES

जवाहर नेहरू विद्यापिठात (जेएनयू) जेएनयूतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंदोलनातील जितेंद्र आव्हाड यांच्या सहभागावर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली अवैध आणि देशविरोधी काश्मीर को चाहिए आझादी अशा घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी परवानगी दिली नसतानाही आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सोमय्या यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत केली होती.

जेएनयूमध्ये गुंडांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला होता. या घटनेचा संपूर्ण देशभरातून निषेध करण्यात आला. जेएनयूतील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सोमवारी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करण्यात आलं होते. या आंदोलनात विद्यार्थी, कलाकारांसह राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. आंदोलनात काश्मीर को चाहिए आझादी अशा घोषणा देण्यात आल्याचा आरोप भाजपानं केला होता.


हेही वाचा -

शिवसेनेला काश्मीरमध्ये पुन्हा ३७० कलम हवंय का? किरीट सोमय्यांचा सवाल

फडणवीस सरकार सर्वात भ्रष्ट, राष्ट्रवादीच्या आमदाराने सुनावलं
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement